पत्नीच्या उच्च पदाचा गैरवापर करून अपमान करणाऱ्यावर सक्त कार्रवाई करा

 



पत्नीच्या उच्च पदाचा गैरवापर करून अपमान करणाऱ्यावर  सक्त कार्रवाई करा

◾पत्रपरीषदेत प्रेमदास खोब्रागडे ची मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : पत्नीच्या उच्च पदाचा गैरवापर करून अपमानजनक व्यवहार करणाऱ्या  गुंड प्रवृत्ती च्या दिलीप मेघानी वर सक्त कार्रवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परीषदेत प्रेमदास खोब्रागडे यांनी केली आहे.

प्रेमदास खोब्रागडे हे 28 ऑगस्ट ला सायंकाळी मुलाचे गणपती अपार्टमेंट गोरक्षण वार्ड, बल्लारपूर येथील रेस्टॉरंट मध्ये गेले व काही कामा निमित्ताने त्यांचे मित्र शिक्षक अनिल कुळमेथे तिथे आले. दोघे ही चर्चा करीत होते. अनिल कुळमेथे यांना वॉशरूम ला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच अपार्टमेंट मध्ये असलेल्या जनरल वॉशरूम मध्ये त्यांना जाण्यास सांगितले असता तिथे त्यांच्याशी त्याच इमारतीमध्ये राहणारे न्यायधीशां चे पती दिलीप मेघानी तीथे आले व अनिल कुळमेथे यांना शिवीगाळ केली. घडलेला प्रकार बघवला गेला नसल्याने प्रेमदास खोब्रागडे तिथे पोहचले. मेघानी ला रस्ता अडविण्याचे कारण विचारून मुलाचे याच इमारतीत रेस्टॉरंट असून मी व अनिल कुळमेथे हे शिक्षक आहोत असे त्यांना सांगितले आणि सभ्यतेने बोलण्याची विनंती केली. परंतु मेघानी त्यांचे काहीही एक न ऐकता दिलीप मेघानी यांनी त्या दोघांची लायकी काढली आणि तुम्ही मला ओळखत नाही, मी तुमचे आयुष्य बर्बाद करीन अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्याच दरम्यान त्यांनी तिथे पोलिसांना बोलविले. पोलीस गाडी तिथे येऊन आम्हाला ठाण्यात येण्यास सांगून निघून गेली.

प्रेमदास खोब्रागडे व अनिल कुळमेथे ठाण्यात गेले असता तिथे अगोदरच दिलीप मेघानी उपस्थित होते आणि त्यांनी पुन्हा वाद करणे सुरु केले. आणि अर्वाच्च शब्दात बोलुन पोलीस ठाण्यात हात उगारून अंगावर आले.

या घटनेमुळे आम्ही दोन्ही शिक्षक पूर्णपणे हवालदिल झालो आणि आम्ही तक्रार करण्यासाठी तिथे थांबलो व तश्या अवस्थेत तक्रार दाखल करुण रात्रो 12 ते 1 च्या दरम्यान घराकडे परतलो, परंतु मला अतिशय स्वाभिमान शून्य झाल्याचा अनुभव झोपू देत नाही आहे. अशा प्रकार पत्नीच्या उच्च पदाचा गैरवापर करून सामान्य मानसांचा अपमान करणाऱ्या  दिलीप मेघानी वर सक्त कार्रवाई करण्याची मागणी प्रेमदास खोब्रागडे यांनी पत्रकार परीषदेत केली आहे. पत्रकार परीषदेला प्रेमदास खोब्रागडे व अनिल कुळमेथे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments