चिमूर शहरात पारंपरिक पद्धतीने ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा.

 




चिमूर शहरात पारंपरिक पद्धतीने ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा.

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे  प्रतिनिधी  : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’ चा सण चिमूर शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

यात शहरातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

‘नारे तकबीर, अल्ला हो अकबर’ आदी घोषणा देत सकाळी ९:०० वाजता रजा सुन्नी मस्जिद,येथून मौलांना तंजिम रजा सदर हाजी कलीम पठाण यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक मासळ रोडवर मार्गस्थ होत मुख्य मार्गानी जामा मस्जिद, कासमपुरा मस्जिद, छोटी मस्जिद समोरच आरीफ शेख ,जिब्राईल पठाण जावा शेख , पप्पू शेख, शाहिद शेख शकील शेख , राजा पठाण साबिर शेख यांच्या पुढाकारातून मिठाई चिवडा पाणी वाटप करण्यात आले.

मिरवणूक मार्गावर शहर भाजपा युवा मोर्चा, टिपू सुलतान फाउंडेशन तर्फे इम्रान कुरेशी डॉ.शकील शेख ,आरीफ शेख, यांच्या नेतृत्वाखाली मिठाई, पाणी वाटप करण्यात आले.

मिरवणुकीत पादचार्‍यांची संख्या लक्षणीय होती. मक्का-मदिना या धार्मिक प्रार्थनास्थळांची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली. तसेच सजविलेले रिक्षा, घोडे, मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

आमदार बंटी भागडीया ,सतीश वारजूकर यांनी मिरवणूकचे स्वागत केले.

शहरात चौका – चौकांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लाल-हिरवे झेंडे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान सहभागी युवक ध्वनिक्षेपकावरून पैगंबरांवर आधारित स्तुतिगीत (नात-ए-रसुले पाक) चे पठण करत संचलन करीत होते.

मिरवणुकीत ईकबाल सौदागर जाबीर शेख ,आबीद रजा , महबूब शेख ,कलीम शेख ,आबिद बेग,यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




Post a Comment

0 Comments