दुचाकीवरून जाणाऱ्या ३ जणांवर बिबट्याने केला हल्ला; गंभीर जखमी झाले

 



दुचाकीवरून जाणाऱ्या ३ जणांवर बिबट्याने केला हल्ला; गंभीर जखमी झाले 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दुचाकीने कोठारी ते पोंभुर्णा, देवई मार्गाने जाणाऱ्या तिघांवर झुडपात घात लावून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला. त्यामुळे जीवितहानी टळली. 

घटना मंगळवारी आज सकाळी १०.३० वाजता कोठारी- देवई रोडच्या एफडीसीएम झरण कक्ष क्रमांक १०४ मध्ये घडली. देवानंद काशीनाथ कुमरे (४४), साईनाथ अनिल भोयर (२५) आणि विजय कालिदास साखरकर (३५) सर्व रा. कोठारी असे जखमींची नावे आहेत. तिघांवरही कोठारी येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात पाठविण्यात आले.




Post a Comment

0 Comments