डाक जीवन विमा पॉलिसीचे बारा लाख एकाहत्तर हजार रुपयाचा धनादेश सपुर्द.

 




डाक जीवन विमा पॉलिसीचे बारा लाख एकाहत्तर हजार रुपयाचा धनादेश सपुर्द.

◾मयत पोलीस कॉन्स्टेबल नितीन कामगुंडा यांच्या वारसदारास डाक जीवन विमा पॉलिसीचे बारा लाख एकाहत्तर हजार रुपयाचा धनादेश सपुर्द

लातूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : लातूर येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल नितीन कमगुंडा यांनी २ वर्षापुर्वी ११ लाखाची डाक जीवन विमा (PLI) पॉलिसी घेतलेली होती. 

मात्र त्यांचा काही दिवसापूर्वी आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या आई श्रीमती शोभा कामगुंडा यांना भारतीय टपाल विभागाकडून १२,७१,०००/- बारा लाख एकाहत्तर हजार रुपयाचा धनादेश श्री. जे. ए. बिब्राळे पोस्ट मास्तर लातूर व गोविंद राजे विकास अधिकारी PLI यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी परमेश्वर बिराजदार  PLI सल्लागार उपस्थित होते.

 डाक विभागाची PLI योजना आता पदवीधरासाठी सुद्धा उपलब्ध आहे. या योजनेत कमी हप्ता व जास्त लाभ होतो तसेच आयकर मध्ये सवलत सुद्धा मिळते. भारताचे सर्वेसर्वा महामहिम राष्ट्रपती द्वारा ही योजना असल्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे डाग विभागातर्फे आव्हान करण्यात येत आहे.




Post a Comment

0 Comments