नगर परिषदेवर महिलांचा घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा धडकला एल्गार मोर्चा

 




नगर परिषदेवर महिलांचा घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा धडकला एल्गार मोर्चा 

◾हजारो महिला व बेरोजगारांची उपस्थिती

◾खासदार आमदारांनी गाजविला मोर्चा


चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी :   नगर परिषद मध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रशासक राज सुरु आहे. तेव्हा पासुनच शहरात अनेक जनतेच्या रास्त समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक महिन्या पासून कांग्रेस तर्फे पत्रव्यवहार निवेदने देण्यात आली. मात्र याकडे जाणीवपूर्वक नगरपरिषदेने दुर्लक्ष करण्याचे कार्य केले. 

या समस्यांच्या निराकरणासाठी शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी चिमूर तालूका काँग्रेस पक्षातर्फे महिलांचा घागर मोर्चा व सुशिक्षित बेरोजगारांचा एल्गार नगर परिषदेवर काढण्यात आला. नगर परिषदेत मागील अनेक वर्षा पासून मुख्याधिकारी, प्रशासक असल्याने यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. 

त्यामुळे नागरिकांना छोट्या - छोट्या कामासाठी तासनतास कार्यालयात प्रतीक्षा करावी लागत होती. तसेच प्रभागातील पिण्याचे पाणी, वॉर्डातील स्वच्छता, विद्यूत अश्या अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. अशा विवीध समस्या घेऊन शुक्रवारी चिमूर - ७४ विधानसभा समन्व्यक डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटी तर्फे नगरपरिषदेवर घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा निषेध मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात खासदार डॉ. नामदेवराव किरसाण, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, गजानन बुटके,सीमा बुटके सामाजिक कार्यकर्त्यां प्रज्ञा राजुरवाडे, यांची उपस्थिती होती. 

मोर्चाची सुरुवात शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता तालूका काँग्रेस कार्यालय येथून झाली. मोर्चा हजारे पेट्रोल पंप पासून मासळ रोड चौक चावडी मोहल्ला मार्गे मार्केट लाईन मार्गे नगर परिषदेवर धडकला. दरम्यान महीला व बेरोजगारांनी मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांचा निषेध करत घागर नगर परिषदेच्या दारावर फोडल्या. थोड्या वेळासाठी नगरपरिषद येथे तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मोर्चाचे रूपांतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा सावित्रीबाई फुले सभागृह येथे सभेत करण्यात आले. सभेला खासदार डॉ. नामदेव किरसान,आमदार अभिजित वंजारी,माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर,डॉ. सतिष वारजूकर, नम्रता ठेमस्कार गजानन बुटके, गीतांजली थुटे आदींनी मार्गदर्शन केले. संचालन उषा हिवरकर यांनी केले.

नगर परिषदे समोर काही काळ तणाव! शहरात अनेक ठिकाणी विविध पक्षाचे अवैध रित्या बॅनर लावण्यात आले आहेत. तर या बॅनरला परवानगी देतांना व काढताना मुख्याधिकारी यांच्या कडून पक्षपाती करण्यात येत असल्याच्या आरोपावरून कांग्रेस पदाधिकारी चांगलेच नगर परिषदेवर आक्रमक झाले होते. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने संवेदनसील समजल्या जाणाऱ्या चिमूर शहरात मोर्चा किंव्हा कुठलेही आंदोलन असले तरी मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहायक पोलीस अधीक्षक वरोरा नओमी साटम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संतोष बाकल बारीक लक्ष ठेऊन होते. दरम्यान पोलीसांची चांगलीच ताराबंळ उडली होती. मोर्चा संपल्यानंतर काही वेळातच मुख्याधिकारी राठोड यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश निघाला त्यांची बदली नगरपंचायत गोधणी रेल्वे जिल्हा नागपूर येथे झाली. या घटनेची चिमुर तालुक्यातच नाही तर संपूर्ण चिमुर विधानसभा क्षेत्रात चर्चा रंगली आहे.




Post a Comment

0 Comments