शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे चिमूर विधानसभा क्षेत्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख यांचा जन्मदिन साजरा

 



शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे चिमूर विधानसभा क्षेत्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख यांचा जन्मदिन साजरा

 ◾प्रशांतभाऊ कोल्हे यांचा शिवसैनिक व पदाधिकाऱ्या कडून जन्मदिन साजर 

चिमुर ( राज्य रिपोर्टर न्युज ),शार्दुल पचारे प्रतिनिधी :  वाहानगावचे युवा, तडफदार सरपंच म्हूणन पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले, रंजल्या -गांजलांच्या मदतीला धावणारे,युवा शेतकरी, नेहमीच कौटुंबिक व सामाजिक संकटाचा सामना करणारे, समाजहीत, मानव सेवा, जपणारे, अधिकारी वर्गाशी मित्रात्वाचे नाते जोपसणारे, वेळप्रसंगी त्यांचे विरोधात कठीण पाऊल उचलणारे, जनसंण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे,सर्वांचे लाडके नेते प्रशांतभाऊ कोल्हे यांचा आज वाढदिवस.

शिवसेना (मा. श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे चंद्रपूर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख प्रशांतभाऊ कोल्हे यांना समस्त चिमूर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांकडून व पदा धिकाऱ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा विविध माध्यमंच्या माध्यमातून देण्यात आल्या व त्यांच्या निवास्थानी जाऊन केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी केक कापून, पुष्पगुछ देऊन, व भेटवस्तू देण्यात आल्या व सोबतच शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला.

यावेळी शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिमूर चे प्रभारी तालुका प्रमुख मा. राजेंद्रभाऊ जाधव, शहर प्रमुख मा. नितिनभाऊ लोणारे, उपतालुका प्रमुख मा.संजयभाऊ वाकडे, उपतालुका प्रमुख मा. भैय्याभाऊ कारेकार, तालुका संघटक रोशनभाऊ जुमडे,शहर अध्यक्ष मनोजभाऊ तिजारे,सुनील हिंगणकर,तसेच समस्त शिवसैनिक व कोल्हे परिवार व आप्तगन उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments