आज शेतकरी बांधव करणार आमदार बंटी भाऊ भांगडिया यांचा सत्कार

 





आज शेतकरी बांधव करणार आमदार बंटी भाऊ भांगडिया यांचा सत्कार 

◾भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे यांची माहिती

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठ ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक ५ सप्टेंबर दु. २ वाजता आयोजित असल्याची माहिती एकनाथ थुटे संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा यांनी दिली आहे.

              महायुती सरकारने दोन वर्षात शेतकऱ्यांना पीक विमा, कापूस, सोयाबीन अनुदान, धान बोनस रक्कम, वीज बिल माफ, दिवसा शेती साठी १२ तास वीज पुरवठा असे अनेक शेतकरी वर्गाला सुखी करणारे निर्णय घेतले आहे.

            आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सतत पाठपुरवठा करीत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक ५ सप्टेंबर दु २ वाजता कार्यक्रम नवीन वाडा पिंपळनेरी रोड, चिमूर येथे आयोजित केलेला आहे. शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन एकनाथ थुटे संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments