अंगणवाडी कर्मचारीच्या उपविभागीय कार्यालय व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर २५ सप्टेंबर ला धडकणार मोर्चा

  




अंगणवाडी कर्मचारीच्या उपविभागीय कार्यालय व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर २५ सप्टेंबर ला धडकणार मोर्चा

◾सात तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारीही समावेश

चिमूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) शार्दुल पचारे प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक. २५ सप्टेंबर ला दुपारी एक वाजता राज्य सरकार च्या फसव्या आश्वासनाचा निषेध करण्यासाठी व  मानधन वाढ पेंशन  रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात बचतगटाची आहार पुरवठा व समृध्दी आहाराची रक्कम वाढविण्यात यावी व इतर मागन्यासाठी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी कर्मचारी मोर्चा ची सुरुवात होऊन थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे.

गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी कर्मचारी महागाईने भरडल्या आहेत त्यांच्याकडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे बुधवार ला निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागन्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे. सदर मोर्च्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आव्वाहन माधुरी रमेश विर चिमुर,प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड,लता राजु देवगडे भद्रावती, ललीता सोनुले मुल,विद्या वारजुकर ब्रम्हपुरी,संयोगिता गेडाम सिंदेवाही,अन्नपुर्णा हिरादेवे वरोरा, रोशनी चंदेल अध्यक्ष चिमुर तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना  यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments