शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

 




शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा 


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चा स्थापना दिवस दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साजरा करण्यात आला. चंद्रपूरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असलेले स्व. छोटूभाई पटेल यांची जयंती व याच दिवशी दि. 13 सप्टेंबर 1997 रोजी विधी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तेव्हा पासून हा दिवशी स्व.  छोटूभाई पटेल यांची जयंती विधी महाविद्यालयाचा वर्धापण दिन म्हणून साजरा केला जातो.

सर्वोदय शिक्षण मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष  अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे उपाध्यक्ष  सुदर्शन जी निमकर, मंडळाचे कार्यकारी सदस्य तसेच  छोटूभाई पटेल यांचे नातू  जिनेश पटेल, विधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख, पदवीत्तर विभाग प्रमुख डॉ. पंकज काकडे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. 

प्रा. डॉ. पंकज काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले व स्थापना दिवस साजरा करण्यामागची भूमिका विषद केली. संस्थेचे उपाध्यक्ष  सुदर्शन जी निमकर यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या स्थापनेत  छोटू भाई पटेल यांच योगदान अतुलनीय असून त्याच्यासारखे दात्तृत्व गुण असेलेली व्यक्ती आज दुर्मिळ असल्याचे मत व्यक्त केले. 

संस्थेचे अध्यक्ष  अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छोटूभाई पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. मध्यवर्ती भारतातील एक सुप्रसिद्ध विधी महाविद्यालय म्हणून शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाची ओळख आहे आणि ती निर्माण करण्यात अनेक लोकांचे योगदान असून स्व. छोटूभाई पटेल हे नाव त्यातील अग्रस्थानी असल्याचे  पोरेड्डीवार यांनी सांगितले. 

या दिनाचे औचित्य साधून विधी महाविद्यालय विध्यार्थीसाठी स्वच्छ चंद्रपूर : सामूहिक जवाबदारी कि व्यक्तिगत जवाबदारी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थयां ना रोख पारितोषिक आणि प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. यात अनुक्रमे 1000,700,500, आणि 200 रुपयाचे तिनं प्रोत्साहनपर पारितोषिक विदयार्थ्यांना मान्यवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सरोज कुमार दत्ता, डॉ. अभय बुटले प्रा. संजय तरवटकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. सुवर्णा मंगरूळकर यांनी व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मार्गवी डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments