चिमूर येथील मुलीच्या शिक्षणाकरीता आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिले आर्थिक मदत

 




चिमूर येथील मुलीच्या शिक्षणाकरीता आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिले आर्थिक मदत

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी : चिमूर येथील रहिवासी असलेली धनश्री अंकुश पूंड ही भंडारा जिल्हयातील शहापूर येथे शिक्षण घेत आहे. मात्र घरच्या आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे शिक्षण घेण्यास अडचन निर्माण होत असल्यामुळं समोरील शिक्षण पूर्ण होऊ शकत नव्हते. त्यामुळं चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे अर्जाद्वारे आर्थिक मदत करण्याची विनंती केली असता. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी जराही विलंब न करता तात्काळ मुलीच्या शिक्षणाकरिता भरीव आर्थिकमदत केली.

त्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्यामुळ धनश्री पुंड या विद्यार्थिनीचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.

यावेळी धनश्री अंकुश पुंड यांना आर्थिक मदत देताना माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाकडे, भाजपा नेते रमेश कांचरलावार, भाजप युवा मोर्चा तालुका महामंत्री श्रेयश लाखे, तालुका महामंत्री अमित जुमडे, बूथ अध्यक्ष आकाश दुर्गे, भाजपा युवा कार्यकर्ता गोलू मालोदे, धनश्री चे वडील अंकुश पुंड आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments