नगर पंचायत कोरपना मार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन




नगर पंचायत कोरपना मार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन 

◾जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोरपना येथे वरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन



कोरपना ( राज्य रिपोर्टर न्युज ) : माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अभियानांतर्गत प्रदूषणाला आढा घालण्याच्या हेतूने तसेच गणेश उत्सवाच्या निमित्त नगरपंचायत कोरपना मार्फत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोरपना येथे मा. नगराध्यक्षा सौ. नंदाताई विजयराव बावणे व मा. मुख्याधिकारी श्री.येमाजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांने उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

गणेशोत्सवात पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण  होत असल्याने हा उत्सव पर्यावरण पूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. शाडू माती पासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असे सर्वांनी नमूद केले.

या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर व सहा.शिक्षक ' शिक्षिका तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच नगरपंचायत कोरपनाचे  मुख्याधिकारी श्री. येमाजी धुमाळ, श्री. अनिल पाईलवार कार्यालय अधीक्षक, अमोल लोकरे कर निरीक्षक, शंकर तांड्रा स्वच्छता निरीक्षक, रवींद्र माजरे, सुरज देवतळे नितीन भोयर, दिगांबर दुर्गमवार, रमेश शेंदलवार, दर्शन दुर्वतकर, आकाश मेश्राम, गजानन पेंदोर स्पर्धेकरिता उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments