अखेर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरतीतील जाचक अटी रद्द.

 




अखेर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरतीतील जाचक अटी रद्द. 

◾आमदार  किशोर जोरगेवार यांचे विद्यार्थांनी मानले आभारमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती मागणी.

मुंबई ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असूनबृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे ही अट आता वगळण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत.

  बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसारएकूण 1,846 पदांची भरती होणार आहे. मात्रया जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांनी या जाचक अटींवर आक्षेप नोंदवला होता. या भरती प्रक्रियेत राज्यभरासह चंद्रपूरातील उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. मात्रप्रचलित पदभरतीमध्ये या प्रकारच्या अटींचा समावेश नसतो. अशा जाचक अटींमुळे साधारणतः २ ते ३ लाख उमेदवारांना पदभरती परीक्षेचा अर्ज भरता येणार नव्हता. महाराष्ट्राती विविध भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असूनया अटीमुळे अनेक युवक-युवतींसाठी नोकरीच्या संधी कमी होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली होती.

  यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन सदर अट तात्काळ रद्द करण्यात यावीअशी मागणी केली होती. याबाबत आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती. सदर प्रकरण तपासून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त यांना दिले होते.

 आता सदर अट रद्द करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आला असूनतसे परिपत्रकही प्रकाशित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व बदलांमुळे आतापर्यंत अर्ज केलेल्यांनी साशंकता बाळगण्याची गरज नाहीनव्याने सुरू होणाऱ्या कार्यकारी सहायक पदभरती प्रक्रियेत त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असूनचंद्रपूरातील उमेदवारांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत.





Post a Comment

0 Comments