पूराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा - आ. किशोर जोरगेवार

 





पूराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा - आ. किशोर जोरगेवार

◾नुकसानग्रस्त भागातील शेतीची अधिकाऱ्यांसह पाहणी, 12 हजार हेक्टर शेती पाण्याखाली


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : वर्धानांदेडआणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. या पुरपरिस्थितीमुळे नदीलगतच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरले असूनत्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानआजमंगळवारीआमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून नुकसान झालेल्या शेतीचे भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करून तात्काळ अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पिक विमा कंपनीने तत्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे.
  यावेळी नायब तहसीलदार राजू धांडेकृषी अधिकारी अंकित मानेमंडळ अधिकारी विशाल कुरेवारमंडळ अधिकारी किरण मोडकवारतलाठी खराततलाठी मनोज शेंडेमारडा चे सरपंच गणपत चौधरीमाजी सरपंच गणपत कुळेप्रवीण पिंपळशेंडेचंदू मातणेसंजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती.
  मागील काही दिवसांपासून चंद्रपूर लगतच्या वर्धायवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम चंद्रपूरात दिसून येत असून वर्धा नदीला पूर आला आहे. या पूरामुळे अनेक शेतींमध्ये पूराचे पाणी जमा झाले आहे. दरम्यानआज आमदार किशोर जोरगेवार यांनी मारडा आणि पिपरी येथील नुकसानीची अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. या पावसाच्या पाण्यामुळे जवळपास 12 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ हजार ५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून सोयाबीनकापूसमिर्ची आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  पाहणीदरम्यानआ. किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. आ. जोरगेवार म्हणाले की, “शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण होऊन त्यांना मदतीचा दिलासा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” शासनाने या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
     या पाण्यामुळे  पूरग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे त्वरित करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघावे आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शेतपिकांच्या नुकसानाचे योग्य मूल्यमापन करून अहवाल तयार करण्यात येईलअसे शेतकऱ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आश्वस्त केले आहे.





Post a Comment

0 Comments