नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून वणजमिनीवरील घरांना मिळणार स्थायी पट्टे

 



नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून वणजमिनीवरील घरांना मिळणार स्थायी पट्टे

◾किशोर पंदीलवार  भाजपचे  बल्लारपुर तालुकाध्यक्ष यांनी केले मागणी 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) :  बल्लारपूर तालुक्यातील विसापूर कोठारी पळसगाव मोहाडी व कळमना येथील वन विभागाच्या जागेवर असलेल्या  जमिनीला अनेक वर्षापासून स्थायी पट्टे नसल्यामुळे या तालुक्यातील लोकांना सरकारी काम बँकेचे काम अन्य घरकुल इतर शासकीय काम व शासनाच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहावे लागत होते.

 अशातच बल्लारपूर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार यानी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही माहिती निवेदन देऊन सांगण्यात आली तेव्हा ना मुनगंटीवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून  बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कोठारी, पडसगाव, मोहाडी, कळमना या गावातील ज्या वनखात्याच्या जमिनीचे पट्टे नसेल त्यांना स्थायी पट्टे देण्याचा निर्णय केला आणि शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या की त्वरित वनविभाग तथा तहसील कार्यालय यांनी  ज्या ज्या गावातील इमारतीच्या जागेचे पट्टे नसेल त्यांना शासन स्तरावरून तात्काळ पट्टे देण्यात यावे अशी सूचना नामदार  सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना केल्या.




Post a Comment

0 Comments