प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनांचा लाभ घेण्याकरिता महावितरणच्या बाईक रॅलीचा कार्यक्रम




प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनांचा लाभ घेण्याकरिता महावितरणच्या बाईक रॅलीचा कार्यक्रम

◾सौर ऊर्जेमुळे पर्यावर संरक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो - हरीश गजबे मुख्य अभियंता

◾२०२४ अंतर्गत घरोघरी मोफत सौर ऊर्जा करीता सर्व ग्राहकांना जागृतता तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता बाईक रॅली काढण्यात आली. 




चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना २०२४ अंतर्गत घरोघरी मोफत सौर ऊर्जा करीता सर्व ग्राहकांना जागृतता तसेच योजनेचा लाभ घेण्याकरिता दिनांक १०.०९.२०२४ ला ११.०० वाजता महावितरण परिमंडळ कार्यालय बाबुपेठ, चंद्रपूर  ते गांधी चौक, जेटपूरा गेट, बसस्थानक, ताडोबा रोड तुकूम मार्गानी एसटी वर्क शॉप दुर्गापूर पर्यंत किमान १०० ते १५० महावितरण अधिकारी व कर्मचारी आणि कंत्राटदार सोबत महावितरणचे कला व क्रीडा मंडळ कर्मचारी यांच्या उपस्थित बाईक रॅली काढण्यात आली. श्री. हरीश गजबे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर यांच्या हस्ते बाईक रॅलीचे उटाघाटन करण्यात आले. 

चंद्रपूर परिमंडळ कार्यालय अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबविणे,सादर योजनेबाबत प्रचार कार्यक्रमाला गतीने चालना देणे,आणि विविध मार्गाने मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना यशस्वी करू शकतो असे आश्वासन श्री. हरीश गजबे, मुख्य अभियंता यांनी बाईक रॅली आयोजित प्रसंगी ते बोलत होते. सौर ऊर्जेमुळे पर्यावर संरक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. ग्राहकांच्या वीज आणि पैसे बचती सोबतच पर्यावरण पूरक असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होऊन,1KW वर 30 हजारअनुदान ,2KW वर 60 हजार अनुदान,3 KW वर 78 हजार अनुदान असुन ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता www.mahadiscom.in /www.mahadiscom.in/ismart/ किंवा संबंधित महावितरणच्या कार्यालयास संपर्क साधावा महावितरणच्या रूप टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्याचे आवाहन महावितरणच्या परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे यांनी बाईक रॅली दरम्यान केले.

बाईक रॅलीचा कार्यक्रम खालील अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थित संपन्न झाले .चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता चंद्रपूर,श्री. दारव्हेकर, कार्यकारी अभियंता बल्लारशाह, श्री. पेगलपट्टी, कार्यकारी अभियंता प्रशासन, श्री. वांदिले,  वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) श्री. बोरीवर,अती. कार्य. अभियंता पडोळे, अती. कार्य. अभियंता हेडाऊ,जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) श्री. चाचेरकर,उपकार्यकारी अभियंता राठोड, लांजेवारआणि सहाय्यक अभियंता बिरमवार यांचे वरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले तसेच सर्व अधिकारी अभियंते / कर्मचारी / कला व क्रीडा मंडळ सदस्य / कंत्राटदार हे सर्व उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments