बारावी स्टेट बोर्ड मेरीट विद्यार्थ्याला 1 लाखाची स्कालरशीप

 




बारावी स्टेट बोर्ड मेरीट विद्यार्थ्याला 1 लाखाची स्कालरशीप 

◾जिल्ह्यातील मागास घटकातील विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती लागू 

◾बॅ. राजाभाऊ खोब्रागडे च्या नावे शिष्यवृत्ती जाहीर 

◾पत्र परीषदेत बहुजन हितकारिणी सभेची घोषणा

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विश्वरत्न डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र, राज्य सभेचे उपसभापती आणि रिपब्लिकन पक्षाचे सक्षम नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभावर जिल्हयातील मागास घटकातील मेरीट विद्यार्थ्यांला त्यांच्या नावे दरवर्षी एक लाख रूपयाची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा बहुजन हितकारिणी सभेचे मध्यवर्ती समिती सदस्य तथा आंबेडकरी युवा नेते सुरेश नारनवरे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत केली. 

बॅ. राजाभाऊ जन्मशताब्दी वर्षा निमित्य वर्षभर विविध कार्यक्रम चालणार आहे. बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्वसम्मती मिळाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता 12वी(स्टेट बोर्ड) मध्ये जिल्हयातून प्रथम येणा-या मागास घटकातील विद्यार्थ्याला 1 लाख रूपये रोख देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षी प्रथम येणा-या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती सुरु राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचा राजनीति, धार्मीक व शैक्षणीक क्षेत्रात भरीव काम राहिलेले आहे. त्यांनी अनेक शाळा, कॉलेज, वसतिगृहे सुरु केले, ते आजही व्यवस्थित सुरु आहेत. त्यांच्या या शैक्षणीक कार्याला साजेशी मानवंदना देण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. 

पत्र परिषदेला अॅड. पुनमचंद वाकडे, बंडू ठमके, विद्याधर लाडे, लहू मरस्कोल्हे, सुभाष ढोलणे, बुध्दप्रकाश वाघमारे, परमेश्वर मेश्राम, भैय्या मानकर, मंगेश गेडाम उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments