ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

 



ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादरम्यान रहदारीला कोणताही अडथळा तसेच जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. 

या बदलानुसार कोहिनूर ग्राउंड - दस्तगीर चौक- गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक -जटपुरा गेट- कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. 

नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कूल -सवारी बंगला चौक नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील. 

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्गुस , गडचांदूर कडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा तसेच बल्लारशा व मूल कडून येणारी वाहनांना शहरांमध्ये जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जूनोना चौकातून शहरांमध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल. 

जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे सर्व नागरिकांनी पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments