शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात यशस्वी करिअर बनविणयासाठी मार्गदर्शन पर कार्यक्रम संपन्न.

 




शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात यशस्वी करिअर बनविणयासाठी मार्गदर्शन पर कार्यक्रम संपन्न.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटने तर्फे एल एल बी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षां च्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वी करिअर घडविण्या साठी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

विधी महाविद्यालयातील प्राविण्य प्राप्त माजी विद्यार्थिनी डॉ. पारोमिता हाटी राय यांचे करिअर मार्गदर्शन या प्रसंगी विद्यार्थ्यांना लाभले. डॉ. पारोमिता राय या सध्या हैद्राबाद येथील एक्सचंजर या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये कायदा अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी व्यवसायिक प्रगतीचे शिखर घाठलेले आहे. 

आपल्या व्यावसायिक प्रगतीचा आलेख विधी विद्यार्थ्यांना विषद करतांना डॉ. पारोमिता यांनी यशस्वी करिअर घडविण्याच्या अनेक टिपण्या सांगितल्या. कायद्याचे ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सर्वत्र मोठया प्रमाणात मागणी असून या क्षेत्रात उत्कृष्ट व्यावसायिक संधी उपलब्ध असल्याचे डॉ. पारोमिता राय यांनी सांगितले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन पर कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. शेख म्हणाले कि विधी अभ्यासक्रम हा दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असल्यामुळे प्रत्येक विध्यार्थी आपलं करिअर उत्कृष्ट रित्या घडवू शकतात. कार्यकामाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी मांडले. डॉ. दत्ता यांनी डॉ. पारोमिता यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल हार्दिक अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पासून प्रेरणा घेण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी संघटनेच्या समन्वयक प्रा. डॉ. मार्गवी डोंगरे यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.




Post a Comment

0 Comments