चंद्रपूर शहरात शुक्रवारी सकल हिंदू समाजाचा मोर्चा; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा करणार निषेध




चंद्रपूर शहरात शुक्रवारी सकल हिंदू समाजाचा मोर्चा; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा करणार निषेध

◾संयोजक शैलेश बागला यांची माहिती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज  ) : येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने येत्या शुक्रवारी 23 ऑगस्टला एका शिस्तबद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा सकाळी 10.30 वाजता शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात  येईल अशी माहिती सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला यांनी पत्रपरिषदेत बुधवारी ( दि.21 ) दिली.



 यावेळी सकल हिंदू समाजाचे संयोजक रोडमल गहलोत, रामकिशोर सारडा, मिलिंद कोतपल्लीवार, गुणवंत चंदनखेडे,दामोदर मंत्री, अजय जयस्वाल,रणजीतसिंग सलुजा,ग्यानचंद टहलियानी, यशवंत कलमवार,मधुसुदन रुंगठा, अशोक हासानी, रीतेश वर्मा, प्रा.जुगलकिशोर सोमानी, विनोद कुमार तिवारी, डॉ.शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा यांची उपस्थिती होती.

बागला म्हणाले,बंगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतली. असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत. हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे. मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. बुधवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊन निषेध नोंदविण्यात येईल. दरम्यान ज्या व्यापारी,शाळा व इतर प्रतिष्ठानांना बंद पाळायचा असेल त्यांनी पाळावा. या मोर्चात अंदाजे 10 हजार हिंदू सहभागी होतील. यात बालकांचा समावेश असणार नाही असेही ते म्हणाले. सर्व हिंदू धर्मियांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.




Post a Comment

0 Comments