विद्याश्री कॉन्व्हेंट मध्ये शाळेच्या कैबिनेट सदस्यांचा शपथविधि समारोह साजरा

 







विद्याश्री कॉन्व्हेंट मध्ये शाळेच्या कैबिनेट सदस्यांचा शपथविधि समारोह साजरा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : बल्लारपुर शहरातील गांधी वार्ड येथे दिनांक १० ऑगस्ट रोजी, विद्याश्री कॉन्व्हेंटने कैबिनेट सदस्यांचा शपथविधि समारंभ उत्साहात साजरा केला.


 कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.शालेय विद्यार्थिनींनी एक सुंदर आणि संस्मरणीय स्वागत नृत्य सादर केले.


 शाळेच्या कॅबिनेट सदस्यांनी आपल्या कर्तव्य बजावनीची शपथ घेतली. निवडून आलेले हेड बॉय कुशल मड़ावी, हेड गर्ल कु. क्रिती मंडल, सहाय्यक हेड बॉय मीज़ान शेख, सहाय्यक हेड गर्ल कु. भूमिका ढोके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  इतर सदस्य सभागृह नेते वैष्णवी वर्मा, खुशबू धोटे, नाज़िया शेख, नेहा शिंपुलकर, दामोदर बोंडे,प्रतीक सोमनकर,आकांशा गायकवाड़, नंदिनी वर्मा,आस्था चौहान,रोहिणी झरकर,रुचिता बोरकर, भार्गवी कायरकर,समरीन सिद्दीकी,मानसी बहुरिया,डिंपल शेंडे,समर्थ कावेरी क्लब सचिव होते.  

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.अनूप खुटेमाटे, प्रदीप भास्करवार, गुलाबसिंग चौहान उपस्थित होते.

 तसेच गुरुनानक पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती रुमाना शेख, विद्याश्री कॉन्व्हेंटचे हितचिंतक श्री. संजय गुप्ता. पत्रकार श्री. वसंत खेडेकर, मनोहर दोतपेल्ली श्री. ज्ञानेंद्र आर्य  कार्यक्रमात उपस्थित होते.

 शाळेचे अध्यक्ष श्री. कैलास खंडेलवाल यांनी श्री.अनूप खुटेमाटे आणि  श्री.प्रदीप भास्करवार यांना स्मृती चिह्न प्रदान केला. या प्रसंगी शाळेचे संस्थापक विद्यार्थ्याना नेतृत्वगुणाचे महत्व सांगितले.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अनूप खुटेमाटे आणि प्रदीप भास्करवार यानी पण नेतृत्व गुण, आत्म विश्वास आणि कौशल्य विकासा वर माहिती दिली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली आर्य यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका कु.समिक्षा डोंगरे आणि सविता सोनवानी  आणि वर्ग ९वी च्या खुशबू धोटे, मानसी बहुरिया आणि डिंपल शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन स्नेहल चापले यांनी केले.




Post a Comment

0 Comments