चिमूरातील चावडी परिसरात होणार श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह

 







चिमूरातील चावडी परिसरात होणार श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह 

◾आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते होणार रविवारला सभागृह बांधकामांचे भूमीपूजन

चिमूर  ( राज्य रिपोर्टर न्यूज ), शार्दुल पचारे प्रतिनिधी  :  वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान निधी या योजने अंतर्गत चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील चावडी परिसरात श्री. संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह मंजूर झाले.

        त्या सभागृहाच्या बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा कार्यक्रम १ सप्टेंबर रविवारला सकाळी ११ वाजता श्री.संत संताजी जगनाडे महाराज अधिष्ठान चावडी मोहला चिमूर येथे आयोजित केला आहे.

        या कार्यक्रमानिमीत्त सभागृह बांधकामाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे हस्ते होणार आहे.

        या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.महादेव पिसे,प्रमुख अतिथी न. प.मुख्याधीकारी डॉ.सुप्रिया राठोड,जेष्ठ वक्ते,तेली समाज गजानन उमाटे,केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज रघुनाथ शेंडे,सामाजीक कार्यकर्ता भाग्यवान खोब्रताडे,प्रकाश देवतळे,अध्यक्ष,श्री.संत संताजी जगनाडे महाराज मंडळ राजू अगडे,प्रदीप बंडे,लता अगडे,सामाजीक कार्यकर्त्यां मनिषा कावरे,मिनाक्षी बंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

       परिसरात होणाऱ्या सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला तेली समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.संत संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ, चिमूर तथा सर्व तेली समाज बांधव चिमूर यांनी केले आहे.









Post a Comment

0 Comments