अंगणवाडीत जाणाऱ्या ५ वर्षीय मुलीची २५ वर्षीय मुलाकडून छेडखानी

 






अंगणवाडीत जाणाऱ्या ५ वर्षीय मुलीची २५ वर्षीय मुलाकडून छेडखानी 

◾पोक्सो अंतर्गत भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद

◾चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन हद्दीत येत असणाऱ्या दाबकाहेटी येथील घटना 

चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ),शार्दुल पचारे  प्रतिनिधी :  दिनांक.२९/०८/२०२४ ला सकाळी ०९:३० ते १०:०० वाजताच्या दरम्यान अंगणवाडीत जात असतांना शाळे समोरील रस्त्यावर आरोपी अमोल अनिल माहुरे वय वर्षे २५ राहणार लोहारा याने पीढीत मुलीला तीच्याकडे असलेल्या बॉटलमधले पाणी मागीतले असता व पीढीत मुलीने पाणी न दिल्याने आरोपीने पीढीताचे पाठीवर चापट मारून व मुलींना हात लावुन लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य केल्याने आरोपी विरुद्ध अप.क्र.१५६/२०२४ कलम ११५ (२), ७४ भारतीय न्याय संहीता, (BNS) सहकलम ८ बालकांचे लैगींक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ पोक्सो अंतर्गत भिसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला.

  सदर घटनेचा पुढील तपास पो.स्टे. प्रभारी अधिकारी सपोनि. जितेंद्र अत्माराम चांदे, ठाणेदार,पो. स्टे. भिसी यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि.रविंद्र वाघ, पो.स्टे.भिसी करीत आहे.




Post a Comment

0 Comments