दुर्दैवी घटना भिषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी

 








दुर्दैवी घटना भिषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी 

◾घटना राजुरा वर्धा नदीच्या पुलाजवळ 

राजुरा ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास बल्लारपुर बामणी येथील गोयल रामकिसन मडावी व मित्र राजुरा जात असताना वर्धा नदीच्या पुलाजवळ चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका आयशर वाहनाला कंटेनर ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ह्यावेळी दुचाकीस्वाराने आपले वाहन बाजूला घेतली मात्र निर्मनाधिन राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्यासाठी टाकलेली ओली माती असल्याने दुचाकी रस्त्यावर पडली.

घटना राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजुरा वर्धा नदीच्या पुलाजवळ उघडकीस आली असुन आयशर वाहनाला पुरेशी जागा नसतानाही कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका युवकाचा बळी गेला.

ह्या अपघातामुळे गोयल रामकिसन मडावी हा युवक जागीच मृत्यू  झाला. तर अरुण गेडाम ह्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तिसरा युवक मात्र सुखरूप बचावला आहे. 

अपघाताची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शवला पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. 






Post a Comment

0 Comments