चंद्रपुर महानगर पालिके तील गट (क) व (ड) वर्गातील 45 अनुकंपाधारक नौकरीच्या प्रतिक्षेत

 







चंद्रपुर महानगर पालिके तील गट (क) व (ड) वर्गातील 45 अनुकंपाधारक नौकरीच्या प्रतिक्षेत

◾14 आगस्ट पासून मनपा परीसरात अनुकंपाधारकां चे बेमुदत आमरण उपोषण 

◾पत्रपरिषदेत अनुकंपाधारक सुजय घडसे ची माहीती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : शासन निर्णय अनुसार चंद्रपुर महानगरपालिकेत सरळ सेवा कोटा अंतर्गत प्रतिवर्ष रिक्त पदांच्या 20 टक्के प्रमाणे पदभरती होत आहे. चंद्रपुर शहर महानगरपालिके मध्ये सामायिक प्रतिक्षासूची मधील गट क व गट ड मधील मोजकेच अनुकंप धारकांना नियुक्ति देण्यात येत आहे. उर्वरित अनुकंपाधारकांना नोकरीवर नियुक्त होण्यास 10 से 12 वर्षाचा कालावधी लागेल. 

तेव्हा संबंधित अनुकंपाधारकांचे वय नियमानुसार बाद झालेले असेल. तसेच परीवारावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे (ड) वर्गातील अनुकंप धारकांना त्वरित शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी सुजय घडसे ने यांनी पत्रपरिषदेत केली आहे अन्यथा 14 ऑगस्ट पासून मनपा परिसरात बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

चंद्रपूर शहर महानगरपालिका येथील 45 अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची भेट घेतली. आयुक्तांनी अनुकंपाधारकांना मराठा आरक्षण बिंदुनामावली आरक्षीत झाली नसल्यामुळे अनुकंप भरती स्थगिती दिली आहे असे सांगीतले तर महानगरपालिका आस्थपना कर्मचारी ने 3 व ४ जागा भरण्याची मंजूरी असल्याचे अनुकपाधारकांना सांगीतले. अनुकंप धारकांना 2022-2023 व 2023-2024 वर्षात नियुक्त करण्याचे आश्वासन दिली गेली परंतु अजुनही नियुक्त्या झाल्या नसल्याने प्रतिक्षा यादीत असणारे अनुकपां धारकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

शासन निर्णयानुसार सरळ सेवा कोटयाती प्रतिवर्षी रिक्त पदांच्या २० टक्के प्रमाणे पद भरती होत आहे. मात्र शासन निर्णयाप्रमाणे सामायिक प्रतिक्षासुची मधील गट 'क' व गट 'ड' मधील मोजकेच अनुकंप धारकांना नियुक्ती मिळत असल्याने प्रतिक्षा सुचीती समाविष्ट सर्व उमेदवारांना नियुक्तीस 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागेल व तेव्हा हे अनुकंपधारक वयाच्या अटीमधून बाद होतील. 

शासन निर्णयामध्ये बदल करुन त्यामध्ये सरळसेवेने रिक्त होणा_या पदाऐवजी सद्यस्थितीत सरळ सेवेचे रिक्त असलेल्या एकुण पदाच्या 20 टक्के पदावर असा बदल केल्यास अनुकंप प्रतिक्षा यादी कमी होण्यास मदत होईल. यासंदर्भात प्रशासन शासनाने अनुकंप धारकांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर अनुकंप धारकांची शारिरीक, मानसिक स्थिती खालावेल. यासंदर्भात अनुकंपाधारकांनी ड वर्गातील सर्व अनुकंप धारकांना शासन सेवेत तात्काळ सामावून घेने, सद्या स्थितित रिक्त एकुण पदाच्या 20 टक्के वर्ग क व वर्ग ड च्या अनुकंपा धारकांची पद भरती करण्यात यावी. 23 आगस्ट 2008 च्या शासन निर्णय 50 टक्के 25 टक्के, 25 टक्के प्रमाणे 100 टक्के अनुकंपा पदभरती करण्याची मागणी यावेळी अनुकंपाधारक युवकांनी केली आहे. 

मागणी मंजूर न झाल्यास 14 आगस्ट 2024 पासुन चंद्रपुर महानगरपालिका परिसरात बेमुदत आमरण उपोषण करण्यास इशारा दिला आहे. पत्रपरीषदेला सुजय घडसे, संतोष बोरकर, आकाश करपे, ओमदेव निखाते, शुभम मोरेश्वर गहुकर, अजय अनिल रामटेके आदि उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments