महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांची कार्यकारणी गठीत

 



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांची कार्यकारणी गठीत.

◾अध्यक्ष पदी सतीश शिंदे तर सचिव पदी ॲड. राहुल थोरात यांची निवड

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक ०७/०७/०२४ रोज रविवारला सकाळी ९ वाजता म.रा. मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा, राजुरा ची सभा पार पडली. सभेत विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. म. रा. मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांच्या सुचनेनुसार संघाच्या कार्यप्रणालीप्रमाणे नवीन वर्षात सामाजिक उपक्रम घेणे, संघ आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे, नवीन सदस्य जोडणे आदी विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले. तसेच कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणी गठित करण्याची सूचना पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांनी दिली होती. त्याकरिता संघाचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे ह्यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात आली. 

यावेळी  सतीश शिंदे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी प्रवीण मेकर्तीवार तर कार्याध्यक्ष पदी संतोष मेश्राम यांची निवड करण्यात आली. सचिव पदी ॲड. राहुल थोरात यांची नियुक्ती झाली तर कैलास कार्लेकर सहसचिव, राकेश कलेगुरवार कोषाध्यक्ष, लोकेश पारखी संघटक, अंकुश भोंगळे प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यांमध्ये रत्नाकर पायपरे, संजय रामटेके, ओंकार आस्वले, विजय जुलमे, अनिलकुमार गिरमिल्ला, गौरव कोडापे, यांचा समावेश आहे. पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे तसेच जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.











Post a Comment

0 Comments