नेवजाबाई हितकारिणी विदयालयाचे सुसज्ज वस्तीग्रुहाचे लोकार्पण

 






नेवजाबाई हितकारिणी विदयालयाचे सुसज्ज वस्तीग्रुहाचे लोकार्पण

◾विद्यार्थ्यांचे हित हेच संस्थेचे उदिष्ट - अशोक भैया

 नागभिड ( राज्य रिपोर्टर ) : वसतिगृहाच्या माध्यमातून शिस्तबद्ध जीवनशैलीचे अनेक धडे  गिरवले जातात. विद्यार्थी जीवनात वसतिगृहातील अधिवास हा  कायमस्वरूपी  हृदयात एक विशेष स्थान निर्माण करते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ते फारच आवश्यक असते. वसतिगृहाचे हे महत्त्व जाणून नेवाजाबाई  भैया हितकारिणी शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा  नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव करिता वसतिगृहाच्या  नूतन इमारतीचे बांधकाम करण्यात येऊन त्याचा लोकार्पण सोहळा शाळेच्या पहिल्या दिवशी संस्था सचिव श्री. अशोकजी भैया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

         वसतिगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमांचे अध्यक्ष  ॲड. प्रकाशजी भैया हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी ॲड. भाष्करराव उराडे, राकेश कऱ्हाडे,सुभाष बजाज हे उपस्थीत होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. विठ्ठलजी बोरकुटे, प्रा. महेश पानसे,  ॲड. शर्मिला रामटेके,  कमलाकर पांडव, प्र. मुख्याध्यापक नरेंद्र चुर्हे हे  उपस्थित होते. 

          या लोकार्पण सोहळ्याच्यां उद्घाटनिय  भाषणात संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैया  यांनी विद्यार्थ्याना व उपस्थित पालक,नागरिक यांना मार्गदर्शन करताना नेवजाबाई हितकारिणी विद्यालय नवेगाव पांडव येथील वसतिगृह  नवेगाव पांडवच्या शैक्षणिक इतिहासात क्रांती घडवेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला.याच लोकार्पण सोहळ्यात

उपक्रमशील शिक्षक मुनिराज कुथे यांनी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात राबविलेल्या  बेस्ट डायरी अवॉर्ड चे बक्षीस  वितरण सुध्दा विद्यार्थ्याना करण्यात आले.  तसेच नवप्रवेशित इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांचे  स्वागत या कार्यक्राअंतर्गत करण्यात आले.

                 सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नरेंद़ चुऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शिवदास बुल्ले  तर आभारप्रदर्शन  ललित महाजन यांनी केले.  आभारप्रदर्शन  ललित महाजन  यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यात  तालुक्यातील अनेक सरपंच,मान्यवर,पालक व श्री गुरूदेव सेवा छात्रालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments