नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन

 







नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीजिल्हा मानव विकास समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालय चंद्रपूर यांच्या  संयुक्त विद्यमानाने नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय सांख्यिकीचे जनक प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करणे या थीम वर सावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्र. जिल्हा नियोजन अधिकारी राजेंद्र कोंडावारप्र. उपसंचालक नरेश धोटेसहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मुजीब शेखलेखाधिकारी श्री. बेलेप्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय भेंडे यांनी तर आभार अमित पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील तसेच सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments