आदिवासी आश्रम शाळेजवळील पेट्रोलपम्पाला 34 गावातील नागरीकांचा विरोध

 







आदिवासी आश्रम शाळेजवळील पेट्रोलपम्पाला 34 गावातील नागरीकांचा विरोध 

◾पेट्रोल पम्पाला अनुमती दिल्यास तीव्र आंदोलन

◾पत्रपरीषदेत चंद्रपुर जिला आदिवासी संघटनेचा इशारा 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : कोरपना तालुक्यातील स्व. भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रम शाळा व स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात परीसरातील हजारों आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. याच शाळेच्या अंदाजे 150 मीटर अंतरावर पेट्रोल पम्पाचे काम सुरू केले आहे. भविष्यात उक्त पेट्रोल पम्पापासून शालेय विद्यार्थिंना होणारी संभावीत धोका लक्षात घेत कोरपना तालुक्यातील 34 गांवातील 3500 नागरीकांनी सहीनीशी जिलाधिकारीकडे आक्षेप अर्ज दाखल केले आहे. पेट्रोल पम्पासाठी संमती नाकारण्यात यावी अन्यथा चंद्रपुर जिला आदिवासी संघटनेकडुन प्रस्तावित पेट्रोल पम्प जागेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिला आदिवासी संघटनेचे संजय खुशाल सोयाम, जितेश कुळमेथे यांनी पत्रपरिषदेत दिला आहे. 

कोरपना तालुक्यात स्व. भाऊराव पा. चटप आदिवासी आश्रम शाळा व स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक विद्यालय ही मोठी व सर्वसुविधाजनक असुन परीसरातील विद्यार्थ्याना याचा फायदा होत आहे. परंतु याच दरम्यान आश्रम शाळेच्या परीसरातील 150 मीटर आत शाळेसमोर पेट्रोल पम्प चे काम सुरू झाले आहे. भविष्यात मुलांना हानी पोहचु शकते. विद्यार्थ्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. प्रस्तावित पेट्रोल पम्पाला लागून असलेल्या पश्चिमेकडील वस्तीगृहात पहली ते बारावी पर्यंत आदिवासी, ओबीसी व अन्य विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात आदिवासी विद्यार्थ्याची संख्या अधिक आहे. आश्रम शाळेतील वस्तीगृहात 500 ते 600 विद्यार्थी निवासीत आहे. या ठिकाणी पहली ते बारावी पर्यंत अंदाजे 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व बाबीवर विचार करून त्या ठिकाणी होणारे प्रस्तावित पेट्रोल पम्प ला वाणिज्य प्रयोजनाकरीता अकृषक अर्जावर परवानगी देने आदिवासींच्या मुलांवर अन्याय करण्यासारखा आहे. शाळा, विद्यालय, वस्तीगृह हे सार्वजनिक ठिकाणी असुन या परीसरात पेट्रोल पम्पाची परवानगी देने उचीत नाही अशी माहीती संजय सोयाम यांनी दिली. 

भविष्यात पेट्रेाल पम्पापासुन स्फोट व रात्र दिवस चालणारी वाहने यामुळे विद्यार्थ्याना ध्वनी प्रदुषण का धोका उद्भवु शकतो. या पेट्रोल पम्पाला कोरपना तालुक्यातील 34 गांव कोरपना, कुकूडबोडी, शिवापूर, दुर्गाडी, कोठोडा, पांडवगुडा, मांडवा, येरगव्हाण, चनई बु, चनई खु., खडकी, बोरगांव खु. कन्हालगांव, मांडवा, जांभुलधरा, कढोली, नारंडा, वडगांव, रामपुर, येलगांव, इंजापुर, गडचांदुर, निजामगोंदी, खिर्डी, सोनुर्ली, वनसडी, जेवरा, सावलहिरा, खैरगांव, धानोली, कुसळ, पिपर्डा, चिंचोल गांवातील पालकांनी आक्षेप घेतला आहे. या पालकांच्या विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करून मौजा कोरपना सर्वे क्रमांक 30/4/अ/1 आराजी 0.35 हे. आर. जमीन वाणिज्य पेट्रोल पम्प करीता अकृषण प्रयोजनार्थ आलेला अर्ज रद्द करण्याची मागणी आदिवासी समाजाने जिलाधिकारी यांचे कडे केली आहे. ही मागणी मंजूर न झाल्यास प्रस्तावित पेट्रोल पम्प च्या समोर पालक, विद्यार्थी व अन्य समाज बांधवों सोबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपुर जिला आदिवासी संगटने चे संजय सोयाम, जितेश कुळमेथे यांनी दिला आहे. 

पत्रपरिषदेला संजय खुशाल सोयाम, बंडु कुमरे, सुधाकर कुसराम, जितेश कुलमेथे, मंगेश सोयाम, प्रविण मडचापे, मंगेश पंधरे आदि उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments