Electricity Consumers वीजग्राहकांना त्रासदायक असलेले प्री-प्रेड वीज मीटर लावने बंद करा ; शहर विकास आघाडीचे धरणे आंदोलनाचा इशारा.

 



Electricity Consumers वीजग्राहकांना त्रासदायक असलेले प्री-प्रेड वीज मीटर लावने बंद करा ; शहर विकास आघाडीचे धरणे आंदोलनाचा इशारा.

◾वीज ग्राहकांना त्रासदायक असलेले प्री पेड वीज मीटर लावणे ताबडतोब बंद करावे. 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : वीज सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज असून सरकारने माफक दराने वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जुलमी धोरणामुळे वीज ग्राहकांचे जगणे कठीण झाले आहे. दिल्ली,पंजाब आंध्र प्रदेश,तेलंगाना राज्यात 200 युनिट वीज मोफत दिली जात आह. परंतु महाराष्ट्रात इतर राज्यातील वीज दराच्या दुप्पट दराने वीज बिलाची आकारणी करून त्या बिलात स्थिर आकार, वीज वाहनकर,वीज  नियामक शुल्क,वीज विक्रीकर असे 30 ते 35 प्रतिशत कर समायोजित करून बिलाची आकारणी केल्या जाते.

यामुळे मुडबिल 1000 असेल तर वीज ग्राहकास तेराशे ते चौदाशे रुपये भरावे लागतात. कंपनीचे काही मीटर सदोष असून ग्राहकाने विजेच्या वापर कमी केला तरी मीटरमध्ये जास्त नोंद असल्यामुळे अनेकांना 300 ते 400 युनिटचे तीन ते चार हजार रुपये प्रति महिना वीज बिलाच्या भरणा करावा लागत आहे. वीज ग्राहक अक्षरशा वैतागून गेले असताना वीज वितरण कंपनीतर्फे बल्लारपूर शहरातील 32 हजार 900 वीज ग्राहकांचे चालू असलेले वीज मीटर बदलून त्या ऐवजी नवीन प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम प्रारंभ केला आहे. या नवीन मीटरमुळे वीज ग्राहकांना प्रथम अडवांस मध्ये रक्कम जमा  करावी लागेल व ती रक्कम संपल्याबरोबर रात्र बेरात्र वीज खंडित होणार आहे. यामुळे अनेक गोरगरीब वीज ग्राहकांचे बेहाल होणार आहे ही महाराष्ट्र  सरकार व वीज मंडळाची दंडेलशाही आहे. 

सरकारच्या या नवीन प्रीपेड मीटर मुळे वीज मंडळात काम करणारे मीटर रीडर, बिल वितरण करणारे व इतर कामगार सेवेतून कमी होऊन बेरोजगारीमुळे हजारो कुटुंबाची उपासमार होणार आहे. 

या अन्याया विरुद्ध जनहिता करिता सदैव संघर्ष करणारे शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष श्री.भारत थूलकर यांचे नेतृत्वात महावितरणचे सहाय्यक अभियंता मासादे साहेब यांना निवेदन सादर करून वीज ग्राहकांना त्रासदायक असलेले प्री पेड वीज मीटर लावणे ताबडतोब बंद करावे. दिनांक 20 जुन रोजी विद्युत् वितरण कार्यालय समोर  धरणे आंदोलनाच्या इशारा दिला आहे. शहर आघाडीचे शिष्ट मंडळात माननीय अरुण लोखंडे, ईश्वर देशभ्रतार, माजी नगरसेवक सरफराज शेख,अवतार सिंग दिगवा, आंबेडकर मून,शंकर वणकर अशोक भावे, ताराचंद रायपुरे, भाऊराव सोनटक्के, रमेश अंगूरी, रमेश रेब्बावार,सुभाष तगडपल्लिवर इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments