महाकाली मंदिर चे मागे खुले पटांगणात एक अनोळखी इसम पुरुष मृत घोषित

 



महाकाली मंदिर चे मागे खुले पटांगणात एक अनोळखी इसम पुरुष मृत घोषित

◾शहर पोलिस अधिकारीला ओळख पाठविण्याची आह्वान 


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर चे मागे खुले पटांगणात एक अनोळखी इसम पुरुष वय अंदाजे 60 वर्ष गुरुवारी  दिनांक 30/5/24 रोजी 04:15 वाजता मंदिर  परिसर येथे झोपलेल्या अवस्थेत पडून आहे. अशी महिती प्राप्त होताच Hc रमेश मेश्राम,PC मनोज कोयचाडे हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर अनोळखी इसम हा काहीच हालचाल करीत नसल्याने व कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्यास उपचारास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता. 

डॉ.अतुल सिंह यांनी तपासून दि.30/5/24चे 05:05 वाजता मृत घोषित केले. या वरून HC रमेश मेश्राम/2104 यांचे रिपोर्ट वरून दि. 31/5/24 रोजी मर्गं क्र. 65/24 कलम 174 crpc नोंद करण्यात आले आहे. 

सदर अनोळखी मृतक इसमाचा वर्णन : वय अंदाजे 60 वर्ष, रंग गव्हाळ, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी, मीशी, वाढलेली काळी पांढरी रंगांची,  अंगात फिक्कट मेहंदी रंगाचा फुल शर्ट, व काळया  रंगाचा, मळलेला फुल पॅन्ट घातलेला हाता पायावर माती चे डाग असलेले सदर वर्णन असलेल्या इसम बाबत माहिती असल्यास त्वरीत तपास अधिकारी psi विजय मुके मो. क्र. 9923401065 यांचेशी संपर्क साधावा .




Post a Comment

0 Comments