शेतकऱ्यांचे हित साधणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प - हंसराज अहीर

 





शेतकऱ्यांचे हित साधणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प - हंसराज अहीर

चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर ) : भाजप महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलेल्या सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्यातील महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग व सर्व समाजातील घटकांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला असून हे अर्थसंकल्प दिलासादायक व राज्याच्या प्रगतीला नव्या उंचीवर नेणारे ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहीर यांनी म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली असून या घोषणेने लहान व मध्यम 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थीनींना शिक्षण व परिक्षा शुल्क सवलत, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित 8 लाख उत्पन्न गटातील इतर मागासवर्गीयांसह 2 लाखाहून अधिक विद्यार्थीनींना लाभ मिळणार आहे. नोंदणीकृत विवाह योजनेंतर्गत 10 हजाराहून 25 हजार वाढीव अनुदान देण्यात आले आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्तकाच्या कुटूंबास 25 लाखाचे सहाय्य, अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाकाठी तीन सिलेंडर मोफत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमाह 1500 रुपये अनुदान, महिला लघु उद्योजकासाठी अहिल्यादेवी होळकर स्टार्ट-अप योजना, शेती नुकसानीची मर्यादा 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर, ओबीसी, व्हिजेएनटी व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 38 ते 60 हजारापर्यंत निर्वाह भत्ता यासारखे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेवून सरकारने 
सामाजिक न्यायाचा पुरस्कार करित सर्वच घटकांना न्याय दिल्याची प्रतिक्रीया अहीर यांनी व्यक्त केली आहे.





Post a Comment

0 Comments