लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रूट मार्च

 



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रूट मार्च

◾बल्लारपुर पोलिसांच्या रुट मार्च 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : लोकसभा मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर बल्लारपुर पोलिसांनी रुट मार्च काढले. पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे आज सोमवार दिनांक 3/06/2024 ला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रूट मार्च दंगा / काबू योजना अंबलवाणी करिता पोलीस स्टेशन बल्लारपूर ते गोल पुलिया, संत तुकडोजी महाराज चौक, गणपती वार्ड, बालाजी कॉम्प्लेक्स चौक, नवीन बस स्टॅन्ड ते शहरातून मुख्य महामार्गाने रेल्वे चौक, जुना बस स्टॅन्ड परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद चौक ते पोलीस स्टेशन बल्लारपूर पर्यंत रूट मार्च सकाळी 10:15 वाजता ते 11:30 वाजेपर्यंत काढण्यात आले.

सदर रुट मार्च करिता बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा बी.शेख  यांच्या नेतृत्वात 6 अधिकारी, 35 पोलीस अमलदार हजर होते.




Post a Comment

0 Comments