आरटीओ कार्यालयातील सफाई कामकाजासाठी

 



आरटीओ कार्यालयातील सफाई कामकाजासाठी 

◾सेवा पुरविण्याबाबत दरपत्रके आमंत्रित

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर येथील साफसफाई कामकाजाकरिता पुढील 11 महिन्याच्या कालावधीसाठी सेवा करार करण्यासाठी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्दीपत्रक अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात आले आहे.    

            या कार्यालयातील साफसफाईचे कामकाज कंत्राटी पध्दतीने करण्यासाठीचे विहित नमुन्यातील दरपत्रक दि.25 जून 2024 पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारीप्रादेशिक परिवहन  कार्यालयजलनगरचंद्रपूर येथे प्रत्यक्ष जमा करावीत किंवा पाठवावीत. मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच दरपत्रके मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाकडे राहतीलअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.




Post a Comment

0 Comments