संत तुकाराम महाराज विचार प्रबोधन व शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न



संत तुकाराम महाराज विचार प्रबोधन व शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बल्लारपूर - बामणी येथील श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाद्वारे संत तुकाराम महाराज विचार प्रबोधन व शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रम 8 जून 2024 रोज शनिवारला घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित समाज बांधवांनाआपल्या कलागुणांना मंचावर  सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यात भाषण ,गायन, वादन सादर करण्यात आले.

श्री. मनोहर माडेकर सरांनी आपल्या  गोड आवाजात  वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे हे  गित सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तसेच विकास पेटकर यांनी गायण करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. प्रेरणा पिंपळकर  या छोट्याशा मुलीने शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर उत्कृष्ट भाषण करून  प्रेक्षकांची  मने जिंकली. प्रा. एन.के. लिंगे सरांनी बासरी वाजवून प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच अनेक कलावंतांनी  अभंग, पोवाडा, व भक्ती गीते सादर करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.

सतराव्या शतकामध्ये गोरगरीब, पीडित समाजाला, अज्ञान अंधश्रद्धा, अन्याय,अत्याचार इत्यादी पासून मुक्त करण्यासाठी आपल्या सामाजिक प्रबोधनातून आजीवन संघर्ष करणारे संत तुकाराम महाराज व तत्कालीन राजेशाहीच्या अन्यायकारक जोखडातून सर्वसामान्य जनतेस बाहेर काढुन स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे  व रयतेचे राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  कार्याचा गौरव व  शिवराज्याभिषेक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  श्री. पि. यू .जरीले तसेच उद्घाटक प्रा. एम .यू .बोंडे, प्रमुख मार्गदर्शक प्रा.एन. के.लिंगे होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. बालाजी भोंगळे  व प्रास्ताविक प्रा. राजेंद्र खाडे सरांनी केले. या कार्यक्रमात  अनेक आबालवृद्ध सहभागी झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर-बामणीची संपूर्ण कार्यकारिणी, मंडळाचे आजीवन सदस्य,युवा आघाडीचे अध्यक्ष श्री. विवेक खुटेमाटे, सचिव अतुल बांदुरकर  व त्यांची संपूर्ण टीम .तसेच महिला आघाडी अध्यक्षा  श्रीमती वंदना पोटे , उपाध्यक्षा श्रीमती किरण बोबडे. श्रीमती सुवर्णा कष्टी  व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments