बामसेफ युनिट गडचिरोली तर्फे राजर्षी शाहू महाराज 150 वी जयंती उत्साहात साजरी !

 



बामसेफ युनिट गडचिरोली तर्फे राजर्षी शाहू महाराज 150 वी जयंती उत्साहात साजरी ! 

     गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) :  गडचिरोली बामसेफ युनिट तर्फे 150 राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अध्यक्षस्थानी मा. लक्ष्मण मोहुर्ले साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून मा. शिशुपाल शेंद्रे  साहेब. मा. योगिराज क-हाडे साहेब. उपस्थित होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सर्वप्रथम दिपप्रज्वलन व महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यानंतर सर्व बामसेफच्या उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन चरित्र व त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक न्याय, लोकशाही पद्धतीने राज्यकारभार आरक्षणाचे जनक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उत्तराधिकारी म्हणून केलेली नेमणूक अनेक इतिहासातील आठवणीला उजाळा दिला. 

तसेच आधुनिक युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर कांशीराम साहेब यांनी आपल्या बहुजन समाजाला मतदानाचा अधिकाराचा उपयोग करून या देशाचे समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी सत्ता केंद्रीत करण्याची जबाबदारी बहुजन समाजाला दिली. परंतु आपण मनूवादी लोकांना बळी पडुन संविधान वाचवण्यासाठी मनुवादी पक्षांना मतदान करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यापासून बहुजन समाजाचं कशा पद्धतीने अडचणी निर्माण करित आहे हे समाजाला समजवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी मा. केशव भालेराव सर मा. हेमंत रामटेके सर, मा. धर्मराव तानादु सर, मा. कैलास खोब्रागडे सर, मा. विनोद बरडे सर, मा. बंडु खोब्रागडे सर, मा. बालाजी मेश्राम सर मा. सुधीर वालदे प्रभारी बसपा विधानसभा गडचिरोली , मा. मंदीप एम गोरडवार, अध्यक्ष बसपा विधानसभा गडचिरोली, मा. सुमन क-हाडे मैडम, मा.खोब्रागडे मैडम, मा. बरडे मैडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. केशव भालेराव सर तर आभार प्रदर्शन मा. कैलास खोब्रागडे सर यांनी केले.




Post a Comment

0 Comments