नॅशनल स्केटींग स्पर्धेत कास्य पदक पटकविणा-या श्रव्य घोडमारेचा आमदार किशोर जोरगेवार यांनी केला सत्कार
हरियाणा येथील नॅशनल स्केटींग स्पर्धेत मिळविले यश
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नॅशनल केअर फेडरेशनच्या वतीने हरीयाणा येथे आयोजित नॅशनल स्केटींग स्पर्धेत कास्य पदक मिळविणा-या 10 वर्षीय श्रव्य चंद्रकांत गोडमारे याचा आमदार किशोर जोरगेवार यांनी त्याच्या घरी भेट देत त्याचा सन्मान केला आहे. यावेळी त्याचे वडील चंद्रकांत घोडमारे आणि आई श्रावणी घोडमारे यांची उपस्थिती होती.
नॅशनल केअर फेडरेशनच्या वतीने आयोजित नॅशनल स्केटींग स्पर्धा नुकतीच हरियाण येथील गुरूग्राम येथे संपन्न झाली. या स्पर्धेत देशभरातील स्केटर्र्स नी सहभाग घेता होता. यात चंद्रपूरातील 10 वर्षीय श्रव्य नेही भाग घेतला होता. सर्वप्रथम दिल्ली येथे झालेल्या चाचणीत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर गुरूग्राम येथील नॅशनल स्पर्धेसाठी त्याला पात्र ठरविण्यात आले. यावेळी त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत कास्यपदक मिळविले आहे.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी बालाजी वार्डातील त्याच्या निवासस्थानी भेट घेत त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचा सन्मान केला आहे. चंद्रपूरात उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. विविध खेळ प्रकारात त्यांनी दमदार कामगीरी बजावली असून चंद्रपूरचे नाव लौकीक केले आहे. अशा खेडाळुंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आज श्रव्य ची भेट घेतली असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच चंद्रपूरात पुढच्या वर्षी आयोजित श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाच्या स्केटींग स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे श्रव्य ने म्हटले आहे.
0 Comments