पत्नीसह सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ

 



पत्नीसह सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ

◾अंकुश भोंगळे यांचा पत्रकार परिषदेत आरोप हायवा, ट्रॅक्टरही ताब्यात घेतले

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पत्नी, सासरा आणि सासरच्या मंडळीकडून नाहक मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप राजुरा येथील अंकुश वसंतराव भोंगळे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

अंकुश भोंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र विठ्ठल डोहे यांच्या मुलीशी अंकुशचा ९ जुलै २०१९ रोजी विवाह झाला होता. दीड वर्ष सुखाचा संसार चालला. यादरम्यान, एक मुलगाही झाला. परंतु, नंतर पत्नी मृणाल हिने क्षुल्लक कारणावरून वाद घालणे सुरू केले. १७ जुलै २०२० रोजी पत्नी मृणालने आपल्या आईवडिलांना बोलावून घेतले. यावेळी सासरा, सासू, मेव्हणा, आतेमामा व अन्य गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी मध्यरात्री माझ्या घरी येऊन वाद घातला आणि शिवीगाळ केली आणि आठ दिवसानंतर मृणालला सोबत घेऊन गेले. महिनाभरानंतर परत तिला माझ्याकडे आणून सोडले. परंतु, कोणत्या कोणत्या कारणाने तिने वाद घालणे सुरूच ठेवले. २८ नोव्हेंबर २०२० पासून मृणाल ही माहेरीच आहे. परंतु, तिच्या कुटुंबीयांकडून हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराचे खोटे गुन्हे दाखल करून माझ्यासह कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप अंकुशने यावेळी केला.

हायवा क्रमांक एमएच ३४/एवी २५८३ व ट्रॅक्टर क्रमाक एमएच ३४/बीआर ३१९८ ही दोन्ही वाहने सासरा राजेंद्र डोहे यांच्या त्रीवेणी ट्रान्सपोर्ट कंपनीत लावून व्यवसाय करीत असताना वादानंतर त्यांनी ही दोन्ही वाहने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, राजेंद्र डोहे व कुटुंबीयांविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर मृणालचा भाऊ जुगल डोहे, राजेंद्र डोहे व काही गुंडप्रवृत्तीच्य युवकांनी बसस्थानक परिसरात माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेची राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर राजेंद्र डोहे हे मला व माझ्या वडिलाला गोळी मारून जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला. राजेंद्र डोहे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून, राजकीय पाठबळावर ते धमक्या देत असून, पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंकुश भोंगळे यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments