ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहाची पाहणी

 



ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहाची पाहणी

◾अद्ययावत सोयी सुविधांसह नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याचे ना. मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथे निर्माणाधीन असलेल्या स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृहाच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिनांक 20/०५/२०२४ ला  पाहणी केली. अद्ययावत सोयी सुविधांसह नियोजित वेळेत सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

स्व. सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र ठरणार आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये याचा समावेश होत असून सध्या प्रगतीपथावर काम सुरू आहे. या कामाची पाहणी करतांना ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या. यावेळी वनविकास महांडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष काशी सिंग, डॉ. विजय बोनगीरवार, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अभियंता संजोग मेंढे आदींची उपस्थिती होती. 

 सभागृहाच्या बांधकामाची गुणवत्ता राखून उत्तम दर्जाचे बांधकाम करण्याच्या सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. या सभागृहामध्ये मिटींग रूम, ग्रंथालय, उपहारगृह, लेबोरेटरी क्लासरूम, स्टाफ रूम, डिजीटल वर्ग खोली, व्हिडियो शॉप क्लासरूम, वातानुकुलित कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा समाविष्ट असणार आहेत. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात येणार आहे. १३१०.७२४ चौरस मीटर परिसरात या सभागृहाचे बांधकाम होत आहे. या प्रकल्पाला ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ११ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments