डाक विभागातील समस्या सोडविण्यासाठी पुर्ण क्षमतेने प्रयत्न करणार - आ. किशोर जोरगेवार

 



डाक विभागातील समस्या सोडविण्यासाठी पुर्ण क्षमतेने प्रयत्न करणार - आ. किशोर जोरगेवार 

 27 वी वे द्विवार्षिक संयुक्त अधिवेशन संपन्न

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  तंत्रज्ञाणाच्या युगातही टपालीने आलेल्या पत्राचे महत्व कायम आहे. या खात्याच्या माध्यमातून पोस्टमन नागरिकांशी थेट जुळत असतो. हे विभाग सेवेचे काम करत आहे. अशात या विभागातील कर्मचा-यांचे प्रश्न प्राथमीकतेने सोडविले पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून डाक विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    नेशनल युनियन आॅफ पोष्टल एम्प्लाॅईज ग्रुप सी पोष्टमनएस.टी. एस. व ग्रामिण डाकसेवक चांदा विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिक संघ येथे 27 व्या द्विवार्षीक संयुक्त अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र - गोवा राज्य सर्कल सेक्रेटरी संतोष कदमपी - 3 चे सहायक सर्कल सेक्रेटरीधनंजय राऊतपी - 4 मुंबई चे जनरल सेक्रेटरी सुनिल झुंझाररावपी - 4 न्यु दिल्लीचे जनरल सेक्रेटरी निसार मुजावारएन.यु.जी.डी.एम. मुबाई - गोवा राज्याचे सर्कल सेक्रेटरी राजेंद्र करपेपी -चंद्रपूरचे माजी अध्यक्ष टि.के खोब्रागडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

  यावेळी बोलतांना आ. जोरगेवार पूढे म्हणाले किचंद्रपूर आणि गडचिरोली हे एक सर्कल असल्याने कर्मचा-र्यांना कर्तव्य बजावताना अडचणी येत आहे. याची कल्पना आहे. हे खाते केंद्राशी निगडीत आहे. असे असले तरी याची पुनर्रचना करण्यासाठी आपण पाठपूरावा करणार आहोत. डाक विभागाची अनेक कार्यालये जुन्या खाजगी ईमारतीत असल्याने तेथे आवश्यक सोयी सुविधा नाही. म्हणून डाक घर कार्यालयासाठी जागा देण्यात यावी अशी मागणीही आपण केली आहे. त्याचा पाठपूरावा आपल्या वतीने सातत्याने सुरु असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. येथे कर्मचा-यांची असलेली कमी संख्याही वाढविण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. हा सेवेकरी विभाग असून आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे या भुमिकेचे आपण आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून सदैव आपल्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

  देशात जवळपास 15 लाख 500 डाकघर आहेत. गरजेनूसार डाग विभागातही आवश्यक बदल करण्यात आले आहे. मात्र ते अपेक्षीत असे नाहीत याबाबत चिंताही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. काम करत असतांना अनेक गोष्टींचा सामना हे सेवक करत असतात. उनवारा आणि पाऊस या तिनही ऋतुत आपण प्रामाणीकपणे सेवा देत आहात याचे कौतुकही यावेळी ओलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व लाल फित कापून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाला डाक विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments