चंद्रपूर- १३ लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंनी मानले मतदार राजाचे आभार.

 


चंद्रपूर- १३ लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंनी मानले मतदार राजाचे आभार.

चंद्रपूर / राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर - १३ लोकसभा मतदार संघाच्या पार पडलेल्या निवडणूकीत रेकॉर्डब्रेक मतदान झाले. चंद्रपूर - १३ लोकसभा क्षेत्रातील एकुण मतदान १८,३७,९०७ असून यापैकी १२,४१, ९५२ एवढे मतदान झाले यात ९,४५,७३६ पैकी ६,५८,४०० पुरुष आणि ८, ९२,१२२ पैकी ५,८३,५४१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकुण ६७.५७ % मतदान झाले. यात ७० राजुरा येथे ७०.०९ %, ७१ चंद्रपूर ५८.४३%, ७२ बल्लारपूर ६८.३६%, ७५ वरोरा ६७.७३%, ७६ वणी ७३.२४%, ८० आर्णी ७९.५२ % एवढे मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणूकीत नवमतदार ते वयोवृद्ध मतदारांनी रखरखत्या उन्हातही उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग घेतला आणि मतदानाचे कर्तव्य बजावले याबद्दल चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सर्व मतदार बंधु भगीणींचे आभार मानले आहेत.

          ते पुढे म्हणाले की, २०२४ ची ही निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावली असून आपली पक्षीय विचारधारा, नेतृत्व, ध्येय, धोरण, कामगीरी, भविष्यातील विजन जनते समोर ठेवून उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचार केला. कोण निवडून येणार हे जरी ४ जूनला ठरणार असले तरी दिनांक १९ एप्रिल रोजी चंद्रपूर १३ लोकसभा क्षेत्रातील मतदार राजांनी कडक उन्हात घरा बाहेर पडून लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केले याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे विशेष आभार मानले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चंद्रपूर - १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांच्या बाजूने सर्वत्र स्पष्ट कौल जनतेने दिला असल्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त करीत त्या प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला असून काँग्रेस तसेच इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले आणि मतदार राजांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.




Post a Comment

0 Comments