महाकाली यात्रेतील पुजा सामग्री दुकान व्यावसायीकांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार
◾यात्रेदरम्यान हटविलेली दुकाने सुरु करुन देण्यास केली होती मदत
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चैत्र महिण्यात भरलेल्या महाकाली यात्रेत दरवर्षी लागणारी दुकाने यंदा लावण्यास मनपा प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली होती. त्या ८० दुकान व्यावसायीकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत व्यथा मांडल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार सदर दुकान तेथेच लावु देण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना केल्या होत्या. त्यामुळे सदर सर्व व्यावसायीकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र महिण्यात माता महाकाली यात्रा भरली होती. यावेळी राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविक माता महाकाली च्या दर्शनासाठी चंद्रपूरात पोहचले होते. मात्र यंदाच्या यात्रेत यात्रा परिसरातील मैदानात पुजा सामुग्री विक्रेत्या छोट्या व्यावसायिकांनी दुकाने लावु नये असे आदेश मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे यात्रेसाठी कर्ज घेऊन सामान खरेदी केलेल्या व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले. त्यामुळे त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती. त्यांनतर आमदार किशोर जोरगवार यांनी सदर व्यावसायीकांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दुकाने लावू देण्यात यावी अशा सूचना मनपा प्रशासनाला केल्या होत्या. त्यांनतर सर्व व्यावसायीकांनी यात्रेदरम्यान दुकाने सुरु केली.
आता यात्रा संपली आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे दुकाने लावता आली. उध्दभवलेले मोठे संकट आमदार किशोर जोरगेवार यांनी दुर केले असल्याचे सदरव्यावसायीकांनी म्हटले आहे. दरम्यान आज रविवारी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात भेट घेत शाल व पुष्पगुच्छ देत आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. आपण कष्ट करुन प्रामाणीकतेने काम करत आहात. लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सोबत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असुन मनपा प्रशासनाने कोणताही अतिरिक्त कर या व्यावसायीकांडून लादु नये अशा सुचनाही केल्या आहे. यावेळी येथील व्यावसायीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments