डुक्कर चोरीचा कारणावरून हत्या केलेल्या दोन पुरुष आरोपींना जन्मठेपेची तर महिला आरोपीला सहा महिने सक्त मजुरी शिक्षा



डुक्कर चोरीचा कारणावरून हत्या केलेल्या दोन पुरुष आरोपींना जन्मठेपेची तर महिला आरोपीला सहा महिने सक्त मजुरी शिक्षा

◾डुक्कर चोरीचा कारणावरून हत्या केलेल्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

◾शहरातील चर्चीत बहुरिया हत्याकांडाचा खुण्यास अखेर आजन्म करावसाची शिक्षा

◾तीन वर्षा नंतर कोर्टाने तिन्ही आरोपींना सजा सुनावली

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर शहरातील वस्ती विभागांच्या सातनल चौक, पोलीस चौकी न.1 जवळपासच्या   डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील घटना डुक्कर चोरीचा कारणावरून हत्या केलेल्या दोन पुरुष आरोपींना जन्मठेपेची तर महिला आरोपीला सहा महिने सक्त मजुरी शिक्षा सुनावली आहे. शहरातील सातनल चौक वस्ती येथे 20 मे 2021 रोजी डुक्कर चोरीचा कारणावरून मृतक राकेश दर्शन बहुरिया याचा गळा कापून हत्या केली होती. तीन वर्षा नंतर कोर्टाने तिन्ही आरोपींना सजा सुनावली आहे.

दर्शन अर्जुन बहुरिया ( 68 ) यांचा मुलगा मृतक राकेश दर्शन बहुरिया याला 20  मे 2021 रोजी डुक्कर चोरीचा शुल्क कारणावरून मोटारसायकलने जात असतांना आरोपीने संगमत करून मृतकचा डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी भाला, तलवारने मारहाण करून गळा कापून खून केला होता.

त्यावरून पो.स्टे. बल्लारपूर मध्ये कलम 302 आर्म अक्ट 4/25  गुन्हा नोंद झाला होता. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शन खाली सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी गुन्हे  शाखेचे पथकाचे मदतीने अथक प्रयास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यात आले.

सदर आरोपी गुन्हाचे प्रकरण सेशन कोर्ट  याचा निकाल 4 फरवरी 2024 रोजी मा.न्यायधीश पी.जी.भोसले यांचा कोर्टात सुनावणी झाली. त्यात न्यायाधीश यांनी यातील आरोपी  1) राजकुमार राजू बहुरिया (21) वय , 2) सुरज राजू बहुरिया वय (26) या दोन आरोपींना जन्मठेप व 1000 /- दंड, महिला आरोपी रूपा राजू बहुरिया ( 47 ) वय  हिला सहा महिने सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड सजा सुनाविण्यात आली. सरकारी पक्षाचा वतीने सरकारी वकील असिफ शेख यांनी बाजू मांडले  पोलीस निरिक्षक आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  कोर्ट पैरवी  भगवान मेश्राम, महिला पोलीस हवालदार अनिता मोहुर्ले यांनी काम पाहिले.





Post a Comment

0 Comments