बालाजी महिला ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रमचे आयोजन

 





बालाजी महिला ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रमचे आयोजन

  बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील बालाजी वार्डात येथे दि. 09/03/2024 शनिवार रोजी बालाजी महिला ग्रुप वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रबोधन कार्यक्रमचे प्रमुख अतिथि सामाजिक कार्यकर्ता डॉ. अभिलाषा गावतुरे होते यावेळी डॉ.अभिलाषा गावतुरे म्हणाल्या की, महिलांच्या प्रगतीचा मार्ग हा शैक्षणिक प्रगतीतून जातो आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने उभे राहायचे असेल तर त्यांनी केवळ छोट्या-मोठ्या गोष्टीतच नव्हे तर त्या सर्व क्षेत्रात प्रगती केली पाहिजे ज्यात पुरुष आहेत. 

महिलांनी केवळ घर सांभाळणे, मुलांची काळजी घेणे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे ही महिलांची जबाबदारी असू नये, स्त्री-पुरुषांनी समान जबाबदारीने कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आणि जगातील सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलांनाही पन्नास टक्के समान सहभाग मिळाला पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदणी रोहनकर यांनी तर आभार प्रदर्शन भावना वर्दीलवार यांनी केले.

कार्यक्रमात हेमा चिंतावार, अंजली खत्री, प्रांजली राजुरकर, मीनल बाटवे ,सुनंदा गंदेवार, सुनंदा बोनगीरवार,  झाडे, माहुरकर ,वंदना पोत्राचे, सुजाता पनके, सीमा धाडवे, संध्या दरेकर, जया धरेकर, अंबाला ताई, फसाला, माधुरी पाल, नक्षीने,वासनीक , कविता खरतड, भावना खरतड, मीनाताई चौधरी, गीता दुधलकर, श्रवंती दारी ,सखुबाई दरेकर इत्यादी महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या.





Post a Comment

0 Comments