महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभागाकडून महिला दिवस साजरा

 






महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे समाजशास्त्र विभागाकडून महिला दिवस साजरा


 बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक 11 मार्च 2024 ला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील समाजशास्त्र विभागाकडून तीन कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून तसेच सावित्री मातेच्या फोटोला माल्यार्पण  करून करण्यात आली. कार्यक्रमाला मंचावर उपस्थित  महाविद्यालयाचे कोऑर्डिनेटर डॉ. रजत मंडल , सत्कारमूर्ती सौ. मंगला रामटेके, सौ .वैद्य, सौ. अश्विनी , कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. सौ. पल्लवी जुनघरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित होते.            

प्रास्ताविकतेत प्रा.शुभांगी भेंडे शर्मा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाद्वारे  महिला दिवस साजरा करण्यामागचा उद्देश   सांगून तीन प्रेरणादायी महिलांच्या कर्तबगारी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून दिली .सौ. मंगला रामटेके आणि सौ. वैद्य या पेशाने चहाचा व्यवसाय करतात. या चहाच्या व्यवसायावरच त्यांनी आपली उपजीविका चालवत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले .जीवनात कोणतेही काम छोटे नसते. कोणत्याही कामाची व्यक्तीने लाज वाटून घ्यायला नको असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याचप्रमाणे प्रा.डॉ.रजत मंडल यांनी महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या प्रा.डॉ.पल्लवी जुनघरे यांनी स्त्री पुरुष समानता याबाबत आपले विचार मांडले आणि कार्यक्रमाला उपस्थित सत्कारमूर्ती यांनी व्यवसाय करताना आलेले आपल्या जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाची संचालन पायल कोडापे यांनी केले.





Post a Comment

0 Comments