नागरिकांना पाहता येईल उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र




नागरिकांना पाहता येईल उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र  

🟧 नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र नमुना – 26, नागरिकांना विविध कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईनसुध्दा पाहता येणार आहे. 

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र नमुना – 26, नागरिकांच्या अवलोकनार्थ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट जिल्हा परिषद कार्यालयमहानगरपालिकासर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारीसर्व तहसिल कार्यालयपंचायत समितीनगरपरिषद व नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यालयांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा शपथपत्र नमुना- 26 अपलोड करण्यात येणार असल्यामुळे या संकेतस्थळावर देखील नागरिकांना शपथपत्र नमुना- 26 पाहता येईल.

13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता नामनिर्देशन पत्रे दिनांक 20 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) निवडणूक निर्णय अधिकारी13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारीचंद्रपूर किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारीचंद्रपूर यांचेकडे दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतजिल्हाधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयातील कक्षामध्ये दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे वरील ठिकाणी कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (विस कलमी सभागृह) येथे सुरु करण्यात येईल.

ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावयाची असेल त्यांचे अर्ज 30 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उपरोक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येतील. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदान 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.






Post a Comment

0 Comments