ॲडव्हान्टेज चंद्रपूर ‘इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन

 




ॲडव्हान्टेज चंद्रपूर इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे 4 मार्च रोजी उद्घाटन  

 केंद्रीय मंत्री  नितीन गडकरीनारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळजिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 - इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन सोमवार दि. 4 मार्च रोजी होणार आहे. 

चंद्रपूर वन अकादमी येथे सकाळी 11 वाजता होणा-या या कार्यक्रमाला केंद्रीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीसूक्ष्मलघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या अॅडव्‍हांटेज चंद्रपूर 2024’ ला उद्योग मंत्रालयमहाराष्ट्र सरकार आणि एमएसएमई मंत्रालयभारत सरकारचे सहकार्य लाभले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे सामर्थ्य प्रदर्शित करतानाच या जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणेपायाभूत सुविधाकुशल मनुष्यबळाच्या बाबतीत चंद्रपूर आणि आसपासच्या प्रदेशाच्या मागासलेपणाबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि उद्योग तज्ञांचे मार्गदर्शन देऊन स्थानिक व्यवसायउद्योजकगट यांना सहाय्य करणे ही या आयोजनामागची प्रमुख उद्दिष्टे आहे.

विविध सत्रांचे आयोजन : दि.4 मार्च रोजी वन अकादमी येथील प्रभा सभागृहात  दुपारी 2.30 वाजता आर्यन अँड स्‍टील’ विषयावर तर दुपारी 4.30 वाजता मायनिंग अँड कोल’ विषयावर तसेच सिद्धांत हॉलमध्‍ये दुपारी 2.30 वाजता अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ या विषयावर आणि दुपारी 4.30 वाजता होणा-या अॅग्रीकल्‍चर अँड अलाइड सेक्‍टर्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित आहे.  

5 तारखेला प्रभा हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता एफआयडीसी अँड बांबू’ व दुपारी 12.30 वाजताच्‍या बांबू इंडस्‍ट्री’ या विषयावर, दुपारी 3.00 वाजता एज्‍युकेशन अँड स्‍कील डेव्‍हलपमेंट’ या विषयावर, सिद्धांत हॉलमध्‍ये सकाळी 10.30 वाजता फायनान्‍स अँड स्‍टार्टअप’ दुपारी 12.30 वाजता सर्क्‍युलन इकॉनॉमी’ वर तर दुपारी 3.00 वाजता होणा-या ‘सिमेंट अँड लाईमस्‍टोन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता विपिन पालिवाल यांचे मोटिव्‍हेशनल टॉक होईल.

या मेगा एक्स्पोला महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून तसेच परदेशातील व्यापारीउद्योगपतीउद्योजकनोकरी-उत्सुकएमएसएमईव्यवसायउद्योग तज्ञ आदींची उपस्‍थ‍िती राहणार आहे.

Post a Comment

0 Comments