बल्लारपूर तालुक्यातील कारवाँ जंगलात अपप्रवेश फिरतांना बल्हारशाह वनविभागाकडून 2 व्यक्तींना अटक

 




बल्लारपूर तालुक्यातील कारवाँ जंगलात अपप्रवेश फिरतांना बल्हारशाह वनविभागाकडून 2 व्यक्तींना अटक 

◾वाघ जेरबंद मोहिमे दरम्यान शासकीय कामात अळथडा;वनगुन्हा दाखल 


बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर तालुक्यातील कारवाँ जंगलात दिनांक 17 मार्च 2024 रोजी दुपारी 3.30 वाजताचे सुमारास  आरोपी 1) चंदन वासुदेव तिलोकाणी, वय 36 वर्षे, रा. गांधी वार्ड, बल्हारपुर, 2) सारंग शैलेश राहुलगडे, वय 23 वर्षे, रा. साईबाबा वार्ड, बल्हारपुर यांनी नियतक्षेत्र बल्हारशाह मधील राखीव वनखंड क्रमांक 493 मधील वनात अपप्रवेश करुन फिरत असल्याबाबत वनातील CCTV Live Camera मधे दिसुन आले. वर नमुद आरोपींना कारवा सफारी गेट येथे थांबवुन त्यांची झडती घेतल असता.

 त्याचे जवळ ज्वलनशील साहित्य आढळुन आले. त्यामुळे वनात अपप्रवेश करुन वनात आग लावण्याच्या दृष्टीने ज्वलनशील साहित्य नेल्याप्रकरर्णी व वाघ जेरबंद मोहिमे दरम्यान शासकीय कामात अळथडा आणल्याबाबत त्यांचे विरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ब, ड नुसार प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08962/224042 दिनांक 17.03.2024 अन्वये वनगुन्हा नोंदवुन त्यांचेकडील साहित्य ( मोटार सायकल व मोबाईल ) जप्त करण्यात आले आहे. 

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक, श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहयोगक, श्री.ए.एस. पठाण, श्री.व्ही.पी. रामटेके, श्री.बि.टी.पुरी, वनरक्षक श्री. सुधीर बोकडे, श्री. तानाजी काम केले, श्री. देव आकाडे, श्री. रंजीत दुर्योधन, कु. वैशाली जेणेकर, कु.माया पवार, श्री. सुनील नन्नावरे, श्री. मनोहर धाईत, श्री. धमेंद्र मेश्राम, श्री.एस.आर. देशमुख यांनी आपले केले. अशी माहिती नरेश रा.भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी दिली.





Post a Comment

0 Comments