17 युनियनमधील 4 हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांची सिएटीपीएसच्या अधिकाऱ्यांशी बैठक

 



17 युनियनमधील 4 हजार कामगारांच्या  विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांची सिएटीपीएसच्या अधिकाऱ्यांशी  बैठक  

बंद असलेल्या बंकरच्या कंत्राटचे होणार नुतणीकरनकामगारांना मिळणार काम.

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सिएसटीपीएस येथील 17 संघटने अंतर्गत कार्यरत 4 हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी सि एस टी पी एस च्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बंकर कुकींग 5,6 आणि 7 चा कंत्राटाचे नुतणीकरण करुन येथे कामगारांना पुर्वरत कामावर घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. त्यामूळे येत्या 20 दिवसात कामारुन बंद करण्यात आलेल्या सर्व कामगारांना काम मिळणार आहे.

  17 युनियन सह पहिल्यांदास हिराई विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला सिएटीपीएसचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवारउपमुख्य अभियंता डॉ. भुषण शिंदेशाम राठोडप्रफुल कुटेमाटेफनिंद्र नाखलेवित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक बाहुबली दोडलअधिक्षक अभियंता महेश राजूरकरमिलींद रामटेकेसमाज कल्याण अधिकारी दिलीप वंजारीउप महाव्यवस्थापक हिना खय्यामयंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे हरमन जोसेफयुवा नेते अमोल शेंडेआदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेअल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनकरणसिंह बैसप्रसिद्धी प्रमुख नकूल वासमवारताहिर हुसेनगौरव जोरगेवारकार्तीक बोरेवारराम मेंढेयंग चांदा ब्रिगेडचे विज कामगार सेनेचे प्रकाश पडालकरण नायरनितिन कार्लेकरशकील शेखउमेश नागपूरेअशोक ठाकरे आदींची उपस्थिती होती.

      चंद्रपूरातील औष्णिक विद्युत केंद्र राज्याला विज पूरवतो. येथील कामगारांमूळे हे शक्य होत आहे. अशात येथील कामगारांच्या समस्यांकडे आपण प्राधाण्याने लक्ष दिले पाहिजे. कामगारांना सन्मानजनक वागणून आपण दिली पाहिजे. त्यांना योग्य सोयी सुविधा व सुरक्षा साधने नियमित दिल्या गेली पाहिजे  आज येथील संपूर्ण 17 युनियन चे पदाधिकारी आहेत. जवळपास 4 हजार कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. हा कामगार महत्वाचा घटक असुन त्यांच्या समस्या गांभिर्याने घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत संबधित अधिका-यांना केल्या आहे.

कामगार बेरोजगार होणार नाही यासाठी जुना कंत्राट संपण्याच्या तिन महिने अगोदर नवीन कंत्राट प्रक्रिया सुरु करण्यात यावीजोशी कमेटीच्या अहवाला नुसार वर्क ऑर्डर नुसार गेट पास देण्यात यावेकंत्राटी कर्मचा-याची दर वर्षी पोलिस व्हेरिफीकेशन ची अट रद्द करुन दोन वर्षातुन एकदाच कामगाराला पोलिस व्हेरिफीकेशन मागण्यात यावेकंत्राटदारांमार्फत कामगारांचे वेतन वेळेवर करण्यात यावेए. एम. सी टेंटरमधून अॅजनमेन हा शब्द वगळण्यात यावासंच आणि हा महानगर पालिका हद्दीत येत असल्याने येथील कामगारांना महानगरपालिका वेतनश्रेनी नुसार वेतन अदा करण्यात यावे अशा सुचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. या बैठकीला सिएसटीपीएसच्या अधिका-यांसह सिटुजनरल वर्कस युनियनभारतीय कंत्राटी कामगार सेनाम.रा.वि.नि.रो.मज. सेनामहाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनामहाराष्ट्र राज्य विद्युत कामगार संघप्रावर फ्रंट का. संघटनामहाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनाउलगुलान विद्युत कंत्राटी कामगार संघटनामहाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनामहाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्यूत कंत्राटी कामगार संघटनामहाराष्ट्र राज्य कामगार सेना आदी युनियच्या पदाधिकाऱ्यांची  उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments