शिक्षकच घडवतो देशाचे भवितव्य : नाजुका आलाम

 






शिक्षकच घडवतो देशाचे भवितव्य  : नाजुका आलाम 

◾कॉग्रेस नेते दिनेश चोखारेचे हे कार्य अभिमानास्पद 

◾मूल तालुक्यातील फिस्कुटी, भावराळा, चांदपूर, चांदपूर हेटी  येथील जिल्हा परिषद  शाळांमध्ये बुक वाटप

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  :  शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे भवितव्य घडवत असतो. म्हणून शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक अडचणींना तोंड देत विद्यार्थी दशेत मुलांनी सतत उपक्रमशील ठेवत असल्याचे मत सामाजिक कायकर्त्या नाजुका हनुमान आलाम यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कायकर्त्या  नाजुका आलाम, काँगेसचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करण कुंभरे,  यांचे उपस्थित  मूल तालुक्यातील फिस्कुटी, भावराळा, चांदपूर, चांदपूर हेटी , येथील  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप करण्यात आले.

यावेळी फिस्कुटी येथे शाळा समितीच्या अध्यक्ष्या ज्योत्सना नितीन राऊत, नदांजी  आबोरकर, साईनाथ मांडाळे, चामदेव कावळे, पुरुषोत्तम वाढई,  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्याक वाकडे सर, शिक्षक खोब्रागडे सर , भोयर सर , देऊळवार सर, साखरे मॅडम, वाघमारे मॅडम, बोबडे मॅडम, भावराळा येते  मुख्याध्यपक एकनाथ गेडाम, शिक्षिका अनघा जाकुलवार, कल्पना पेंदोर, देवयानी शूरपम, 

 चांदापूर येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल नैताम, शिक्षक रुपेश परसवार, सुनील निमगडे,  शिक्षिका कविता रोकमवार,  शिक्षक सुरेश जिल्हेवार, शिक्षिका ज्योती सूर्यवंशी,  चांदपूर हेटी येथे शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर शेरकी  यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि,   दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद असून आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल.  जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे. तसेच  विद्यार्थ्यांनी बचतीची सवय लावली पाहिजे त्यांनी मनी बँक चा वापर केला तर तो फायदा त्यांनाच होईल असेही त्या म्हणाल्या. 

वरील सर्व शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ता नाजूका आलाम यांनी शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवा आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनोना मध्ये बुक वाटप करण्यात आले.

यावेळी जुनोनाच्या मुख्याध्यापिका ज्योती लहामगे, शाळा समितीच्या शांताताई मोरे, शिक्षिका उषा इटनकर, शिक्षिका चंदा पूद्दटवार, शिक्षिका सुमित्रा चौधरी, शिक्षिक प्रफुल करवाडे, शिक्षिक प्रकाश गोरे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवा येते मुख्याध्यापक आत्माराम शेंडे यांची उपस्थित होती.





Post a Comment

0 Comments