वणी व आर्णी मतदारसंघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

 




वणी व आर्णी मतदारसंघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा  

 मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी 

 आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सुचना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) उपविभागीय कार्यालय वणी येथे वरील दोन्ही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी याशिनी नागराजन तसेच उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह मतदार संघातील उपविभागीय पोलीस अधिकारीतहसीलदारनायब तहसिलदार व नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सदर आढावा सभेत लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यात मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या  स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत मतदान जनजागृती व मतदार नोंदणीनव मतदारांची नोंदणीमयत व स्थलांतरित नावे कमी करणेयादी शुद्धीकरणमहिलांचा सहभाग तसेच मतदानाची टक्केवारी वाढवणे यावर चर्चा करण्यात आली. वंचित घटक जसे तृतीयपंथीदेहविक्री करणा-या स्त्रियाभटक्या जाती जमातीतील व्यक्तीआदिवासी यांचे समावेशन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यावरसुध्दा चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मतदान केंद्रातील पायाभूत सुविधासंवेदनशील मतदान केंद्रेमागील निवडणुकांमधील निवडणूक संदर्भातील दाखल झालेले गुन्हे व झालेली कारवाई तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाची प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या विविध सूचना यांची अंमलबजावणी करणे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. एकाच इमारतीमध्ये पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या इमारती तसेच स्ट्राँग रुम आणि डिस्पॅच हॉलला त्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यासंबंधी करावयाच्या उपाययोजना याविषयी निर्देश दिले.





Post a Comment

0 Comments